50 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता महागाई भत्ता 50 टक्के झाला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 50 टक्के दराने महागाई भत्ता आणि महागाई सवलत दिली जाईल. 1 जानेवारी 2024 पासून ते लागू केले जाईल, ज्यामध्ये लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल. या निर्णयानंतर 50 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे केंद्र सरकारचे मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. Modi government gave a gift to central employees and pensioners dearness allowance increased
काल पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने पाच वर्षांसाठी १०,३७१.९२ कोटी रुपयांच्या खर्चासह इंडिया एआय मिशनला मंजुरी दिली आहे. इंडिया एआय मिशन सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधील धोरणात्मक कार्यक्रम आणि भागीदारीद्वारे AI नवोपक्रमाला गती देण्यासाठी सर्वसमावेशक इकोसिस्टम तयार करेल.
तागाच्या किमतीबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत ज्यूटच्या एमएसपीमध्ये 122 टक्क्यांनी वाढ झाली आहे, ज्यामुळे 44 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. याचा विशेषत: भारतातील पूर्वेकडील प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल आणि ओरिसा येथील शेतकऱ्यांना फायदा होईल.
Modi government gave a gift to central employees and pensioners dearness allowance increased
महत्वाच्या बातम्या
- जुल्फीकार अली भुट्टो गेले जीवानिशी; 44 वर्षांनी पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने चुकीची ठरवली फाशी!!
- जरांगेंचे आंदोलन + वंचितच्या सूचनांवर महाविकास आघाडीचे नेते गप्प; वंचितच्या नेत्याकडूनच आघाडीची बैठक “एक्सपोज”!!
- शहाजहान शेखला CBI कोठडी, वैद्यकीय तपासणीनंतर CIDच्या ताब्यात!
- खासदार नवनीत राणांना व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची धमकी!