• Download App
    पाकिस्तान - चीनच्या सीमेवर भारताचे ‘प्रलय’; 120 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र खरेदीस मोदी सरकारची मंजुरीModi government approves purchase of 120 pralay ballistic missiles

    पाकिस्तान – चीनच्या सीमेवर भारताचे ‘प्रलय’; 120 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र खरेदीस मोदी सरकारची मंजुरी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारत – चीनमध्ये सीमेवर तणाव वाढला असतानाच, संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सशस्त्र दलांसाठी 120 प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या योजनेला संरक्षण मंत्रालयाने आज मंजुरी दिली आहे. ही क्षेपणास्त्रे चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात केली जाणार आहेत. Modi government approves purchase of 120 pralay ballistic missiles

    प्रलय क्षेपणास्त्रे 150 ते 500 किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या लक्ष्यांचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे. जवळपास 120 प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली असल्याने रॉकेट फोर्स स्थापन करण्याच्या योजनेला बळ मिळाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रलय क्षेपणास्त्रांचे आता मोठ्या प्रमाणात उत्पादन करून ती सैन्याच्या घातक शस्त्रास्त्र साठ्यात समाविष्ट केली जातील.


    India – China : चिनी सैन्य मागे घेतले तरच पुढची चर्चा; अजित डोवालांनी चिनी परराष्ट्र मंत्र्यांना सुनावले!!


    भारतीय सैन्य दलाची मारक क्षमता बळकट होण्यासाठी रॉकेट फोर्स उभारण्याची योजना दिवंगत सैन्यदल प्रमुख सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी आखली होती. या योजनेला आता मूर्त रूप येत आहे.

    अचूक मारक क्षमता

    प्रलयची अचूकता 10 मीटर म्हणजेच 33 फूट इतकी आहे. याचाच अर्थ लक्ष्यावर अचूक धडकल्यास होते तितकेच नुकसान हे क्षेपणास्त्र 33 फुटांच्या कक्षेत कोसळल्यावर होईल.

    रात्रीच्या अंधारात हल्ल्याची क्षमता

    प्रलय क्षेपणास्त्राचा वेग जवळपास प्रती तास 2000 किलोमीटर इतका आहे. चीनकडे या क्षमतेचे डोंगफेंग – 12 क्षेपणास्त्र आहे. पाकिस्तानकडे गझनवी, एम – 11 (चीनकडून मिळालेले) आणि शाहीन क्षेपणास्त्र आहे. यातील गझनवी 320 किलोमीटर, एम – 11 350 किलोमीटर आणि शाहीन 750 किलोमीटर मारा करू शकतो. मात्र, प्रलय रात्रीही हल्ला करण्यास सक्षम आहे. यात इन्फ्रारेड किंवा थर्मल स्कॅनर असून, त्या माध्यमातून रात्रीही हल्ला करणे शक्य आहे.

    भारतीय सैन्य दलाच्या घातक शस्त्रसाठ्यात अग्नि 5 पर्यंतच्या सर्व रेंजची क्षेपणास्त्रे समाविष्ट आहेतच. त्यात आता प्रलय क्षेपणास्त्राची भर प्रत्यक्ष सीमा रक्षणासाठी घालण्यात येणार असल्याने भारतीय सैन्य दलाची एकूण मारक क्षमता प्रचंड वाढणार आहे.

    Modi government approves purchase of 120 pralay ballistic missiles

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट