• Download App
    गणेशोत्सवासाठी कोकणात यंदाही धावणार मोदी एक्स्प्रेस; पाहा वेळ आणि ठिकाण!! Modi Express will run in Konkan for Ganeshotsav this year too

    गणेशोत्सवासाठी कोकणात यंदाही धावणार मोदी एक्स्प्रेस; पाहा वेळ आणि ठिकाण!!

    प्रतिनिधी

    मुंबई : गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वे फुल्ल असतात. एक्स्प्रेसचे तिकीट मिळत नसल्याने अनेकजण अतिरिक्त पैसे मोजून खासगी वाहनाने जातात. मात्र गणेशोत्सवासाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात भाविकांच्या सोयीसाठी मोदी एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. Modi Express will run in Konkan for Ganeshotsav this year too

     कुठून सुटणार ट्रेन?

    यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी दिनांक २९ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरून ‘मोदी एक्स्प्रेस’ धावणार आहे. यासंदर्भात नितेश राणेंनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाही गणपतीला गावी जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस आणण्यात येणार आहे. गेल्या १० वर्षापासून बसेस सोडत आहोत, त्यानंतर मागील वर्षापासून मोदी एक्स्प्रेस सगळ्यांसाठी सोडण्यात आली.



    २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन तुमची हक्काची मोदी एक्स्प्रेस सुटणार आहे. ही एक्स्प्रेस दादरपासून कणकवलीपर्यंत जाणार असून, वैभववाडीमध्ये थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसमध्ये एक वेळेचे जेवण दिले जाणार आहे. आरतीचे पुस्तकही देणार आहोत. सगळी तयारी झालेली आहे, अशी माहिती देखील नितेश राणेंनी दिले आहे.

    राणेंचे आवाहन

    गणेशोत्सवासाठी मोदी एक्स्प्रेसने प्रवास करायचा असल्यास तिकीटासाठी भाजपाच्या मंडल किंवा तालुका अध्यक्षांना फोन करण्याचे आवाहन नितेश राणेंनी केले आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील मंडळ आणि तालुका अध्यक्षांना फोन करा आणि आपली सीट बुक करा, असे राणेंनी म्हटले आहे.

    Modi Express will run in Konkan for Ganeshotsav this year too

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची