Good economics is bad politics, असा 1990 च्या दशकानंतर भारतात समज व्हावा, अशी परिस्थिती निर्माण झाली होती हे खरे. कारण त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था सुधारणारे नेते राजकारणात मात्र जिंकण्याची चमक दाखवू शकले नव्हते. राजकीय प्रतिभेने हे नेते कमी नव्हते. उलट ते नरेंद्र मोदींच्या पेक्षा जास्त प्रतिभावान होते. मोदींनी बोट पकडून त्यांना “गुरू” केले नव्हते, तर हे नेते मोदींना खऱ्या अर्थाने राजकीय गुरुस्थानी होते. पण तरी देखील मोदींना खऱ्या अर्थाने गुरुस्थानी असणारे नेते राजकारणात मात्र आजच्या तुलनेत जिंकण्याची चमक दाखवू शकले नव्हते. ही चमक मोदींनी दाखविली. Good economics is bad politics हे समीकरण मोदींनी मर्यादित अर्थाने का होईना, पण बदलले. Fair economics is good politics हे नवे समीकरण त्यांनी तयार केले.
– आर्थिक सुधारणेचे प्रवर्तक नरसिंह राव
1990 च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचल्यानंतर नरसिंह राव यांनी भारतात आर्थिक सुधारणांची पहाट आणली. देशात नवे औद्योगिक धोरण आणून लालफित शाही संपवली. त्यांनी देशाला जागतिक आर्थिक पटावर आणून ठेवले. भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत मानाचे स्थान मिळवून दिले. नरसिंह राव यांची ही अनमोल कामगिरी सगळ्या जगाने मान्य केली. जगातल्या विद्वानांनी नरसिंह राव यांच्या बुद्धी कौशल्यापुढे मान डोलवली. पण नरसिंह राव भारतात राजकीय दृष्ट्या जिंकू शकले नाहीत. त्यांनी पाच वर्षे सरकार यशस्वी चालविले. देशाची अर्थव्यवस्था नुसती ठीकठाक केली असे नाही, तर तिला तोपर्यंतची अभूतपूर्व गती दिली. पण निवडणुकीचे अंकगणित नरसिंह राव वेगवेगळ्या कारणांमुळे व्यवस्थित सोडवू शकले नाहीत. भारतीय जनतेने त्यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगून सुद्धा त्यांच्या पदरात निवडणुकीतले यश पुरेसे टाकले नाही.
– आर्थिक सुधारणांचे वाहक वाजपेयी + मनमोहन सिंग
नरसिंह रावांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणा अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या दोन पंतप्रधानांनी व्यवस्थित वेगाने पुढे चालू ठेवल्या. आर्थिक प्रगतीला दोन्ही पंतप्रधानांनी नीट दिशा दिली. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक मंदीचे वेगवेगळे धक्के पचवू शकेल अशी अवस्था वाजपेयी आणि मनमोहन सिंग या दोन्ही पंतप्रधानांनी आणून ठेवली. पण या दोन्ही पंतप्रधानांना मर्यादेपलीकडचे राजकीय यश मिळू शकले नाही. निवडणुकीच्या अंकगणितात वाजपेयी हे नरसिंह राव यांच्यापेक्षा बेहतर ठरले. पण मनमोहन सिंग या अंकगणितात कुठेच बसले नाहीत. कारण नरसिंह राव आणि वाजपेयी यांच्यासारखे स्वतंत्र नेतृत्वाची प्रतिभा मनमोहन सिंगांकडे अपेक्षित धरणे योग्य नव्हते. मनमोहन सिंग हे राजकीय नेते नव्हते. ते बुद्धिमान अर्थतज्ज्ञ आणि कसलेले नोकरशाह होते.
– मर्यादा ओळखणारा नेता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी मात्र नरसिंह राव वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या काळात भारतात अस्तित्वात असलेली good economics is bad politics ही संकल्पना बदलून टाकली. त्याऐवजी Fair economics is good politics ही संकल्पना रुजवायचा प्रयत्न केला. याचा अर्थ मोदींची राजकीय प्रतिभा नरसिंह राव वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्यापेक्षा फार उच्च दर्जाची होती आणि आहे, असे अजिबात नाही. किंबहुना नरसिंह राव आणि वाजपेयी यांनी ज्या पद्धतीचे राजकीय प्रतिभा दाखविली, तशी मोदींकडे प्रतिभा आणि प्रतिमा मोदींकडे नाही. अर्थात तशी ती आपल्याकडे आहे, असा दावाही मोदींनी कधी केला नाही. मोदींनी आपल्या मर्यादा व्यवस्थित ओळखल्या. म्हणूनच Fair economics is good politics हे तत्त्व ते अंमलात आणू शकले.
– मोदींच्या आर्थिक सुधारणा
मोदींनी केलेल्या आर्थिक सुधारणा अगदी जीएसटी अंमलबजावणी ही too much great अशी अजिबात म्हणता येणार नाही. पण आर्थिक सुधारणांचा स्तर त्यांनी समाजाच्या निम्नस्तरापर्यंत आणून सोडला हे त्यांचे credit नाकारायचे कारण नाही. पण त्याचबरोबर फक्त व्यापारी वृत्तीच्या आर्थिक सुधारणा ही मोदींच्या आर्थिक धोरणाची मर्यादा राहिली, हे सत्यही नाकारण्यात मतलब नाही. मोदींनी आर्थिक सुधारणा धोरण आणि राजकीय विजय मिळवण्याचे गणित व्यवस्थित बसवायचा प्रयत्न केला. Father of the Indian economic reforms हे नामाभिधान नरसिंह राव यांना शोभले. तसे नामाभिधान आपल्याला मिळावे, अशी मोदींनी अपेक्षा केली नाही. तसे ते त्यांना कुणी दिलेही नाही.
– मोठा वारसा
पण भारतात कुठलेही जागतिक धक्के पचविण्याची क्षमता असलेली अर्थव्यवस्था निर्माण करणे, भारताला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेच्या महामार्गावर आणून सोडणे यामध्ये मोदी सर्वसमावेशक राजकारण करून यशस्वी ठरले. नरसिंह राव आणि वाजपेयी यांच्या काळातली आर्थिक साक्षरता स्थानिक क्षमता मोदींच्या काळात कितीतरी वाढल्याचे ते लक्षण ठरले. अमेरिकेच्या दमबाजी पुढे नरसिंह राव आणि वाजपेयी झुकले नव्हते. मनमोहन सिंग यांनी सुद्धा भारताचा सन्मान राखून अमेरिकेशी अणुकरार केला. या तिन्ही पंतप्रधानांचा वारसा मोदी चालवताहेत. ते ट्रम्प यांच्यासारख्या “अमेरिकन राहुल गांधी” पुढे झुकायची शक्यता नाही.
Modi changed equation of good economics is bad politics
महत्वाच्या बातम्या
- रशियन तेलावरून भारतावर ट्रम्प यांच्या सल्लागाराचा पुन्हा हल्ला!
- Nepal : नेपाळ हिंसाचार प्रकरणी ओलींविरुद्ध FIR; पोलिसांना निदर्शकांवर अत्याचार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप
- मुद्दा ओल्या दुष्काळाचा आणि शेतकरी कर्जमाफीचा, पण “स्वप्न” महाराष्ट्राचा “नेपाळ” करायचा!!
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- राजकीय पक्षांमार्फत होणारे मनी लाँड्रिंग गंभीर बाब; ठोस कायदा का नाही