नाशिक : बंगाली धोतर नेसून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी विजय उत्सवात मग्न होते, त्याचवेळी राहुल गांधींनी “शांतपणे”दोन राज्यांच्या सत्तेत शिरकाव केला.Modi celebrates victory wearing Bengali dhoti; Rahul Gandhi enters power in two states!!
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपापला राजकीय स्वभाव आणि प्रकृती नुसार प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
– बंगाली जनतेला मोदींचे आश्वासन
पश्चिम बंगाल मध्ये ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सायंकाळी बंगाली धोतर आणि कुडता परिधान करून भाजपच्या मुख्यालयात विजय उत्सवात सामील झाले. त्यांनी तिथे जोरदार भाषण सुद्धा केले. त्यांनी पश्चिम बंगालचा विजय श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अर्पित केला. त्याचवेळी त्यांनी बंगाली महिलांना सुरक्षित राज्याची ग्वाही दिली. बंगालमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आयुष्मान भारत योजना पहिल्या दिवसापासून लागू होईल. त्याचबरोबर घुसखोरांचा बंदोबस्त देखील पहिल्या दिवसापासून करण्यात येईल, अशी आश्वासने त्यांनी दिली. भाजपसाठी बंगालचा विजय हा गंगोत्री ते गंगासागर अशा भौगोलिक विस्ताराचा ठरला.
– प्रत्येक विजय उत्सवात मोदींचा सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्येक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतल्या मुख्यालयाचा विजय उत्सवात नेहमीच सहभाग घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी काल बंगाल, आसाम आणि पुदुचेरीचा विजय उत्सव साजरा केला. मोदी पंतप्रधान असले, तरी त्यांनी सर्व राज्यांच्या विधानसभांच्या विजयात नेहमीच उत्साहाने सहभाग घेतला.
– गांधी परिवाराचा (अ)सहभाग
त्या उलट राहुल गांधी किंवा गांधी परिवार कुठल्याच राज्यांच्या काँग्रेसच्या विजयात कधी सामील झाल्याचे दिसले नाही. त्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात सुद्धा कुठला कार्यक्रम घेतल्याचे दिसले नाही. त्यानुसार काल राहुल गांधींनी केरळ मधल्या विजय उत्सवात सहभाग घेतला नाही.
– INDI आघाडी टिकवून ठेवायची चाल
पण म्हणून राहुल गांधींनी कुठलेच राजकीय हालचाल केली नाही, असे बिलकुल घडले नाही. उलट राहुल गांधींनी काल शांतपणे मोठी राजकीय चाल खेळत INDI आघाडी टिकवून ठेवण्याचा “डाव” टाकला. त्यांनी पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मावळते मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आणि उगवते मुख्यमंत्री थलपती विजय यांच्याशी फोनवरून संवाद साधला. राहुल गांधींनी तामिळनाडूत एकाच वेळी परस्पर विरोधकांशी संवाद साधण्याची राजकीय चतुराई दाखविली. वास्तविक राहुल गांधींना एम. के. स्टालिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघमशी युती करायची नव्हती. त्या ऐवजी त्यांना थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाशी मैत्री करायची होती.
पण पी. चिदंबरम आणि तामिळनाडूतल्या स्थानिक नेत्यांनी राहुल गांधींची सूचना मान्य केली नाही. त्यामुळे काँग्रेसला द्रविड मुन्नेत्र कळघम बरोबरच पराभव पत्करावा लागला.
– तामिळनाडूच्या सत्तेत काँग्रेसचा शिरकाव
पण राहुल गांधींनी स्वतःहून हार मानली नाही. त्यांनी थलपती विजय यांच्याशी संपर्क साधून काँग्रेसचा तामिळनाडूतला सत्तेतला शिरकाव निश्चित करून ठेवला. थलपती विजय यांच्या तामिळगा वेत्री कळघम पक्षाने तामिळनाडूत विजय मिळवला असला तरी त्यांना बहुमतासाठी काँग्रेसच्या पाच आमदारांची गरज लागेल त्यामुळे विजय यांनी सुद्धा राहुल गांधींशी मैत्रीपूर्ण संवाद साधला.
– ममता आणि स्टालिन
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला आपल्या तृणमूळ काँग्रेस पासून दूर ठेवले होते. पण त्यांना त्याचा फटका बसला. राहुल गांधींनी ममतांच्या पराभवानंतर त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून चर्चा केली. भाजपने १०० आमदार चोरल्याच्या ममतांनी केलेल्या आरोपांना पाठिंबा दिला. त्याचबरोबर त्यांनी स्टालिन यांच्याशी सुद्धा चर्चा केली. राहुल गांधींनी या दोन्ही चर्चांमधून INDI आघाडी टिकवून ठेवण्याची चाल खेळली. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला, तरी तृणमूळ काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम हे दोन्ही पक्ष संपलेले नाहीत. तृणमूळ काँग्रेसला बंगाल मध्ये 92 जागा मिळाल्यात, तर द्रविड मुन्नेत्र कळघमला 60 जागा मिळाल्यात. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सत्ता गमावली असली, तरी त्यांचे राजकीय महत्त्व पूर्ण संपुष्टात आलेले नाही हेच राहुल गांधींनी हेरले म्हणून INDI आघाडी टिकवून ठेवण्यासाठी त्या दोन्ही नेत्यांशी त्यांनी संवाद साधला.
– केरळमध्ये सत्ता
केरळमध्ये तशीही काँग्रेस जिंकली आहे. काँग्रेस तिथे सत्ता स्थापन करणार आहे. पण कुठल्याच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा उत्सव दिल्लीत करायचा नाही, ही काँग्रेसची प्रथा असल्याने काँग्रेसने दिल्लीत केरळचा विजय उत्सव साजरा केला नाही. त्यामुळे राहुल गांधी केरळ मधल्या विजय उत्सवात सामील झाले नाहीत. त्यांना “तसल्या” विजय उत्सवात सामील होणे हे राजकीय पायरी उतरण्यासारखे वाटले की काय, हे कळायला मार्ग नाही. पण ते किंवा बाकीचे काँग्रेसचे नेते केरळ मधल्या विजय उत्सवात सामील झाले नाहीत हे मात्र खरे!! पण म्हणून केरळ मधल्या सत्तेत शिरकाव करण्यास राहुल गांधी आणि बाकीचे काँग्रेसचे नेते चुकले नाहीत.
Modi celebrates victory wearing Bengali dhoti; Rahul Gandhi enters power in two states!!
महत्वाच्या बातम्या
- Adar Poonawalla : अदार पूनावाला यांची राजस्थान रॉयल्ससोबत भागीदारी; IPLमध्ये मोठी डील
- Trump : ट्रम्प यांचा मोठा निर्णय: जर्मनीतून हजारो अमेरिकी सैनिक मागे; NATO मध्ये तणाव वाढला
- गंगोत्री ते गंगासागर भाजपने बाजी मारली; पण अण्णामलाईला अडवल्यामुळे कावेरीची मोहीम राहिली!!
- TVK Vijay : तामिळनाडूचा राजकारणात चक्रावणारी गणिते; द्रविडी चौकट मोडून नव्या कोऱ्या विजयच्या हातात दिली सगळी सूत्रे!!