Modi Cabinet Decisions : मोदी मंत्रिमंडळाने आज गव्हासह 6 रब्बी पिकांचा MSP वाढवण्याचा निर्णय घेतला. सरकारने गव्हाचे किमान समर्थन मूल्य (MSP) 40 रुपयांनी वाढवून 2,015 रुपये प्रति क्विंटल केले आहे. जाणून घ्या इतर पिकांचे नवीन दर… Modi Cabinet Decisions rabi crops msp modi cabinet hikes wheat msp by rs 40 to rs 2015 per quintal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळाने आज गव्हासह 6 रब्बी पिकांचा MSP वाढवण्याचा निर्णय घेतला. सरकारने गव्हाचे किमान समर्थन मूल्य (MSP) 40 रुपयांनी वाढवून 2,015 रुपये प्रति क्विंटल केले आहे.
आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) बार्लीवर एमएसपी 35 रुपयांनी, हरभऱ्यावर 130 रुपयांनी, मसूर 400 रुपयांनी, मोहरी 400 रुपयांनी आणि सूर्यफूल 114 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता जव 1635 रुपये, हरभरा 5230 रुपये, मसूर 5500 रुपये, मोहरी 5050 रुपये आणि सूर्यफूल 5471 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाईल.
गव्हाचा एमएसपी 40 रुपये वाढवून 2,015 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे, जो पूर्वी 1,975 रुपये प्रति क्विंटल होता. गव्हाचा उत्पादन खर्च 1,008 रुपये प्रति क्विंटल असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.
एमएसपी म्हणजे काय?
MSP (किमान आधार मूल्य) म्हणजे ज्या दराने सरकार शेतकऱ्यांकडून अन्नधान्य खरेदी करते. सध्या सरकार खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात पिकवलेल्या 23 पिकांसाठी एमएसपी निश्चित करते. खरीप (उन्हाळी) पिकांच्या कापणीनंतर लगेच रब्बी (हिवाळी) पिकांची पेरणी ऑक्टोबरपासून सुरू होते. गहू आणि मोहरी ही मुख्य रब्बी पिके आहेत.
वस्त्रोद्योगासाठी पीएलआय योजनेला मंजुरी
यासह, केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी 10,683 कोटी रुपयांच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, या योजनेमुळे देशांतर्गत उत्पादन आणि निर्यातीला चालना मिळण्यास मदत होईल.
ठाकूर म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने MMF (कृत्रिम फायबर) परिधान, MMF फॅब्रिक्स आणि टेक्निकल टेक्सटाईलच्या 10 विभाग/उत्पादनांसाठी 10,683 कोटी रुपयांच्या PLI योजनेला मंजुरी दिली आहे.
वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी PLI योजना 2021-22 च्या अर्थसंकल्पात 13 क्षेत्रांसाठी केलेल्या घोषणांचा भाग आहे. अर्थसंकल्पात 13 क्षेत्रांसाठी 1.97 लाख कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा करण्यात आली होती.
Modi Cabinet Decisions rabi crops msp modi cabinet hikes wheat msp by rs 40 to rs 2015 per quintal
महत्त्वाच्या बातम्या
- PLI scheme for Textiles : केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वस्त्रोद्योगासाठी PLI योजनेला मंजुरी, सरकारने रब्बी पिकांवर MSP वाढवली
- Mansukh Hiren Murder Case : अशी झाली होती मनसुख हिरेनची हत्या, संपूर्ण कथा एनआयएच्या आरोपपत्रात!
- NIA Charge sheet : प्रदीप शर्माने सुपारी घेऊन केली मनसुख हिरेनची हत्या, सचिन वाझेंनी दिली होती मोठी रक्कम- एनआयएचे आरोपपत्र
- योगायोग की षडयंत्र? : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू होताच चीन- पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील कमांडर बदलले
- ‘डोअर टू डोअर’ लसीकरणाच्या मागणीवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार, देशात लसीकरण व्यवस्थित सुरू असल्याचे मत