• Download App
    Modi bowed down in front of balasaheb Thackeray posters shows both Hindutva icons respect each other, but Uddhav Thackeray tuned different

    बाळासाहेबांपुढे मोदी झुकले, हे ब्रॅण्डिंग बाळासाहेबांचे की मोदींचे??; पण यात उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित मुंबई दौऱ्याआधी सकाळपासून बाळासाहेबांपुढे मोदी झुकल्याच्या पोस्टर्सची चर्चा आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबईभर ही पोस्टर्स लावून मोठी चर्चा घडवली आहे. मराठी माध्यमांनी तर या पोस्टर्स मधून ठाकरे गटाने भाजपला डिवचल्याचे म्हटले आहे. Modi bowed down in front of balasaheb Thackeray posters shows both Hindutva icons respect each other, but Uddhav Thackeray tuned different

    पण बाळासाहेबांपुढे मोदी झुकल्याच्या पोस्टर्स मधून शिवसेनेच्या ठाकरे गटाने बाळासाहेबांचे ब्रॅण्डिंग केले आहे की मोदींचे?? हा जेन्यूईन प्रश्न मात्र कोणी विचारलेला दिसत नाही. कारण बाळासाहेब ज्येष्ठ – वरिष्ठ नेते होते. हिंदुत्वाचे आयकॉन होते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी नाकारले होते?? त्यांनी बाळासाहेबांचा राजकीय वारसा आणि विचार कधी नाकारला होता?? हा मूलभूत प्रश्न आहे.

    किंबहुना 2.5 वर्षातल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगात बाळासाहेबांचा राजकीय वारसा आणि विचार कोणी बाजूला केला?? कोणी बाजूला ठेवला?? बाळासाहेबांचे हिंदुत्व वेगळे आणि प्रबोधनकारांचे हिंदुत्व वेगळे अशी वैचारिक मांडणी करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांबरोबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर एकाच वेळी मांडीला मांडी लावून कोण बसत आहे??, याचा विचार बाळासाहेबांपुढे मोदी झुकले अशी पोस्टर्स लावणाऱ्यांनी केला आहे का?? हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. पण ते मराठी माध्यमांनी विचारले नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाला त्याचे उत्तरही द्यावे लागलेले नाही.

    त्यापलिकडे जाऊन बाळासाहेबांपुढे मोदी झुकल्याचे पोस्टर झळकवून ते बाळासाहेबांचे मार्केटिंग करतायेत का मोदींचे?? कारण शिवसेनेचा ठाकरे गट हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ओळखला जातो. मग त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे मोदी झुकल्याची पोस्टर्स उपलब्ध आहेत का?? ती उपलब्ध असतील तर ती पोस्टर्स ठाकरे गटाने मुंबईच्या रस्त्यांवर का झळकवली नाहीत??

    बाळासाहेबांपुढे मोदी झुकले हे खरेच. पण त्याच बाळासाहेबांचा राजकीय वारसा घेऊन तर शिंदे गट सहा महिन्यांपूर्वीच भाजपला जाऊन मिळाला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे नावच मूळात बाळासाहेबांची शिवसेना असे आहे. त्यामुळे बाळासाहेबांची पुढे मोदी झुकले हे म्हणण्यातून किंवा अशी पोस्टर झळकवण्यातून बाळासाहेबांबरोबरच मोदींचेच राजकीय ब्रॅण्डिंग होत नाही का??

    त्याहीपेक्षा वेगळा मुद्दा असा की मोदी यांनी ज्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले, त्या समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. या नावाला मंजुरी भले ठाकरे – पवार सरकारने दिली असेल, पण ते शिंदे – फडणवीस सरकारने कायम ठेवले. याचे राजकीय इंगित ठाकरे गटाला समजले नाही का?? आजही मोदी जेव्हा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत, त्यांच्या अनेक कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाच्या उद्घाटनाचा आहे.

    याचा अर्थ मोदींना बाळासाहेबांचा राजकीय हिंदुत्वाचा वारसा मूळातच मान्य आहे. त्यांचे राजकीय आणि वयाचे जेष्ठत्व मूळातच मान्य आहे. मग अशावेळी बाळासाहेबांपुढे मोदी झुकल्याची पोस्टर्स झळकवून शिवसेनेचा ठाकरे गट बाळासाहेबांचे ब्रँडिंग करतो आहे की मोदींचे??, हे समजायला फार मोठ्या राजकीय अभ्यासाची गरज नाही.

    Modi bowed down in front of balasaheb Thackeray posters shows both Hindutva icons respect each other, but Uddhav Thackeray tuned different

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!