• Download App
    जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांची पगडी परिधान करून मोदी वारकरी झाले!!; देहूच्या शिळा मंदिर लोकार्पणाचे आमंत्रण!!|Modi became a Warkari by wearing the turban of Jagadguru Santshrestha Tukobaraya !!; Invitation to dedicate Shila temple of Dehu

    जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांची पगडी परिधान करून मोदी वारकरी झाले!!; देहूच्या शिळा मंदिर लोकार्पणाचे आमंत्रण!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जगद्गुरु संतश्रेष्ठ तू तुकोबारायांची पगडी परिधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वारकरी झाले…!! देहूच्या शिळा मंदिर लोकार्पणाचे आमंत्रण वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान कार्यालयात जाऊन नरेंद्र मोदींना दिले.Modi became a Warkari by wearing the turban of Jagadguru Santshrestha Tukobaraya !!; Invitation to dedicate Shila temple of Dehu

    या वेळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचा संत तुकाराम महाराजांची पगडी, वारकरी संप्रदायाची वीणा, चिपळ्या, उपरणे, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन आणि गळ्यात तुळशी हार घालून सत्कार करण्यात आला.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात जाऊन या शिष्टमंडळाने त्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर पंतप्रधानांना देहूमध्ये उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाचे निमंत्रण देखील या शिष्टमंडळाने दिले आहे.

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलिकडेच झाले. याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेत विशेष आभार मानले.

    या शिष्टमंडळात भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि मान्यवर उपस्थित होते.

    Modi became a Warkari by wearing the turban of Jagadguru Santshrestha Tukobaraya !!; Invitation to dedicate Shila temple of Dehu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा