विशेष प्रतिनिधी
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम कुठलाही असो ते आपल्या भाषणातून प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर भर द्यायला विसरत नाहीत, ते म्हणजे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्याची जबाबदारी आणि सामर्थ्य, एकाच वेळी आधुनिकता आणि परंपरा यांचा मिलाफ आणि घराणेशाहीवर प्रहार हे ते तीन मुद्दे आहेत. Modi attack on dynasticism from the National Youth Festival
नाशिकच्या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी या तीन मुद्द्यांवर भर देत देशातल्या घराणेशाही राजकारणावर जबरदस्त प्रहार केला. त्याचवेळी त्यांनी युवकांना घराणेशाहीवर मात करण्याचा फॉर्म्युला सांगितला. देशाच्या राजकीय भवितव्याचे घराणेशाहीने किती नुकसान केले आहे, देश किती मागे ठेवला आहे, हे आपण पाहिलेच आहे पण या घराणेशाहीवर मात करण्याची संधी युवकांना मिळाली आहे, ती त्यांनी मतदानाद्वारे जरूर प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
पण त्यापलीकडे जाऊन देशातल्या युवकांना त्यांनी राजकीय प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवून घराणेशाहीवर मात करण्याचा फॉर्म्युला सांगितला. जेवढ्या मोठ्या प्रमाणात देशातले युवक देशाच्या विविध राजकीय प्रक्रियांमध्ये सामील होतील, तेवढा घराणेशाहीचा धोका कमी होत जाईल. त्यामुळे युवकांनी जास्तीत जास्त राजकीय प्रक्रियेत आपल्याला सामावून घ्यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. थोडक्यात त्यांनी घराणेशाहीला “रिप्लेस” करायचे असेल, तर मोदींनी युवकांनी लोकप्रतिनिधित्व मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे स्पष्ट सांगितले.
यातून त्यांनी भाजपच्या पुढच्या वाटचालीचीच चुणूक दाखवली. भाजप पुढच्या निवडणुकांमध्ये घराणेशाहीचे आरोप असलेले उमेदवार टाळूनच नवे उमेदवार देण्याची शक्यता मोदींनी यातून सूचित केली.
त्याचवेळी त्यांनी युवकांना देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांनी करायच्या योगदानाविषयी जबाबदारीचे जाणीवही करून दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेत भर घालण्यासाठी काम करत असताना भारतीय परंपरा विसरू नका. आपल्या माता भगिनींचा सन्मान राखा. माता भगिनींच्या नावाने शिव्या देऊ नका, असे आवाहन त्यांनी युवकांना केले. भारत अत्यंत वेगाने प्रगती करत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. या यामध्ये युवकांचे सर्वाधिक योगदान असणार आहे, असा विश्वास देखील पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करून एक प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्याला नाशिककरांनी जोरदार प्रतिसाद दिला.
Modi attack on dynasticism from the National Youth Festival
महत्वाच्या बातम्या
- विजय लोकशाहीचा, विजय शिवसेनेचा ; ढोंगी मुखवटा फाटला – श्रीकांत शिंदे
- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला ‘ED’च्या रडारावर!
- अयोध्येचे निमंत्रण नाकारताना काँग्रेसचे “मुस्लिम फर्स्ट” धोरण; 80 ते 85 % मुस्लिम मते मित्र पक्षांकडे सरकण्याची काँग्रेसला भीती!!
- उद्धव ठाकरेंचे आमदार पात्र ठरवताना विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव होता??, मुख्यमंत्र्यांचा सवाल!!