• Download App
    राष्ट्रीय छात्र सेनेचे अत्याधुनिकीकरण; संरक्षण मंत्रालयाची समिती स्थापन; आनंद महिंद्रा, धोनी करणार सूचना |Modernization of the National Student Army; Establishment of a committee of the Ministry of Defense; Anand Mahindra, Dhoni will suggest

    राष्ट्रीय छात्र सेनेचे अत्याधुनिकीकरण; संरक्षण मंत्रालयाची समिती स्थापन; आनंद महिंद्रा, धोनी करणार सूचना

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राष्ट्रीय छात्र सेनेत बदलत्या काळाला अनुकूल अत्याधुनिक सुधारणा करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली असून या समितीत भारताचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा आणि विश्वचषक विजेता क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश करण्यात आला आहे. ओरिसाचे माजी खासदार बैजनाथ पांडा यांच्याकडे समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.Modernization of the National Student Army; Establishment of a committee of the Ministry of Defense; Anand Mahindra, Dhoni will suggest

    राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी मध्ये रचनात्मक आणि व्यवस्थात्मक सुधारणा सुचविण्याची जबाबदारी या समितीकडे आहे. आधुनिक काळाशी सुसंगत आणि भारतीय सैन्यदलाला उपयुक्त ठरतील, अशा प्रकारच्या सूचना या समितीकडून येणे अपेक्षित आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण अनिवार्य करण्याकडे केंद्रातील मोदी सरकारचा कल आहे.



    यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या आणि प्रशिक्षकांच्या प्रोफेशनल स्किल्स वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, विद्यार्थ्यांच्या क्षमता त्या दृष्टीने कशा विकसित करता येतील, त्यासाठी कोणते अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण व्यवस्था तयार करावी लागेल, यासंबंधीच्या सूचना या तज्ञ समितीकडून संरक्षण मंत्रालयाने अपेक्षित केल्या आहेत.

    राष्ट्रीय छात्र सेनेचेची सुरुवात स्वातंत्र्योत्तर काळात करण्यात आली. पंडित हृदयनाथ कुंझरू यांच्या अध्यक्षतेखाली छात्र सेनेची सुरुवात झाली. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना छात्र सेनेचे शिस्तबद्ध प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली.

    भारतीय सैन्य दलासाठी उपयुक्त तसेच युद्ध काळ आणि शांती कार्यात उपयुक्त ठरेल, असे प्रशिक्षण छात्र सेनेतील विद्यार्थ्यांना देण्यात येते. प्रोत्साहन म्हणून त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीत त्यांच्या गुणवत्तेत 2 ते 3 टक्क्यांची भरही छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांच्या गुणांकनात टाकण्यात येते.

    अर्थात आनंद महिंद्रा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश असलेल्या समितीकडून या पलिकडच्या आगामी आव्हानाला तोंड देणाऱ्या आणि नवीन काळाला अनुकूल ठरणाऱ्या प्रोफेशनल स्क्रील्स वाढविणाऱ्या सूचना अपेक्षित आहेत. संरक्षण मंत्रालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

    Modernization of the National Student Army; Establishment of a committee of the Ministry of Defense; Anand Mahindra, Dhoni will suggest

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??