विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वयनाचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा 2 चा सविस्तर कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत जोडो यात्रा 1 मध्ये सुमारे 3000 किलोमीटर चालल्या नंतर राहुल गांधी भारत जोडो यात्रा 2 मध्ये सुमारे 2500 किलोमीटर चालणार आहेत. भारत जोडो 1 ही यात्रा दक्षिण – उत्तर होती, तर भारत जोडो यात्रा 2 ही पश्चिम – पूर्व अशी असणार आहे. Mockery of Rahul Gandhi’s Bharat Jodo 2 Yatra by rajeev chandrashekhar
मात्र या यात्रेची केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडवली आहे. ज्या महात्मा गांधींच्या दांडी यात्रेवरून प्रेरणा घेत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, त्या यात्रेच्या स्मारकाचा वर फोटो शेअर करत त्याच्या खाली राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा व्यंगचित्र त्याला जोडले आहे.
दांडी यात्रेत महात्मा गांधीं समवेत भारतातली सर्वसामान्य जनता जोडली होती. दांडी यात्रेतून इंग्रजांना भारतीय जनतेची एकजूट दिसली. आपली राजवट भारतात फार काळ चालू राहू शकणार नाही याची इंग्रजांना जाणीव झाली. पण त्या उलट केवळ “गांधी” हे नाव धारण करून त्या यात्रेची प्रतिष्ठा भारत जोडो यात्रेला प्राप्त होणार नाही, असेच राजीव चंद्रशेखर यांनी या व्यंगचित्राद्वारे सूचित केले आहे.
दांडी यात्रेदरम्यान महात्मा गांधींच्या हातात काठी होती. राहुल गांधींच्या हातात 538 कोटींच्या नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्याची थैली दाखविली आहे. त्या पाठोपाठ अन्य काँग्रेस नेत्यांच्या हातात त्यांच्या घोटाळ्यांच्या वेगवेगळ्या रकमेच्या थैल्या दाखविलेले हे व्यंगचित्र आहे. या व्यंगचित्रातून राजीव चंद्रशेखर यांनी भारत जोडो यात्रा 2 ची खिल्ली उडवली आहे.
Mockery of Rahul Gandhi’s Bharat Jodo 2 Yatra by rajeev chandrashekhar
महत्वाच्या बातम्या
- Mission Mahagram : ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि IDBI बँक यांच्यात सामंजस्य करार!
- जम्मू-काश्मीर : शोपियान चकमकीत TRF दहशतवादी ठार, दारूगोळा मोठ्याप्रमाणावर जप्त
- ”राहुल गांधी त्याच मंदिरात जातात जिथे बाबरचे…’ हिमंता बिस्वा सरमा यांचा जोरदार हल्लाबोल!
- ”अजून किती खालच्या पातळीवर जाल, जगभरात देशाला अपमानित करत आहात ” मोदींचा विरोधकांवर घणाघात!