• Download App
    मोबाईल गेम जिहाद; झाकीर नाईकची भाषणे ऐकवून जैन, हिंदू मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न; गाझियाबाद - मुंब्रा कनेक्शन; अब्दुल अन्सारीला अटक Mobile Game Jihad; Jain listening to Zakir Naik's speeches

    मोबाईल गेम जिहाद; झाकीर नाईकची भाषणे ऐकवून जैन, हिंदू मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न; गाझियाबाद – मुंब्रा कनेक्शन; अब्दुल अन्सारीला अटक

    प्रतिनिधी

    ठाणे : एक 17 वर्षीय जैन मुलगा बेपत्ता झाला. नंतर तो उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथल्या मशिदीत नमाज पढत असताना सापडला. झाकीर नाईकच्या प्रभावाने धर्मांतराचा विचार केल्याचे त्याने कबूल केले. या मुलाच्या वडिलांनी इमाम आणि अन्य एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. Mobile Game Jihad; Jain listening to Zakir Naik’s speeches

    मात्र या तक्रारीतून मोबाईल गेम जिहादचा एक गंभीर प्रकार समोर आला असून त्यात मस्जिद समितीच्या एका माजी सदस्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो गाझियाबाद मधलाच रहिवासी आहे, तर त्याचा साथीदार ठाणे मुंब्रा इथला रहिवासी असून त्याचे खरे नाव शहानवाज मकसूद खान असे आहे. तो बड्डो या बनावट नावाने मोबाईल गेमच्या खेळात अल्पवयीन मुलांना अडकवायचा डाव खेळत असे.

    तसेच फोर्टनाइट सारख्या गेमिंग एप्सवर सक्रिय असलेली एक टोळी हिंदू मुलांचे ब्रेनवॉश करते आणि त्यांना गेम जिंकण्यासाठी कुराणाचे श्लोक वाचायला लावते, असे गाजियाबाद पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

    यात पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी देखील स्पष्ट केली आहे. बनावट नावाने गेमिंग ॲप तयार करून अल्पवयीन मुलांना टॅप केले जायचे. ते जिंकले तर त्यांना बक्षीस आणि हरले तर त्यांना कुराणाच्या आयाती पढवल्या जायच्या. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात त्यांना इस्लामची माहिती दिली जायची आणि त्यानंतर झाकीर नाईकची इस्लामी प्रचाराची भाषणे ऐकवली जायची. यातून मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाममध्ये धर्मांतर करायला लावायचे हा डाव होता.

    गाजियाबाद मध्ये अटक केलेला अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी हा मशिद कमिटीचा सदस्य होता. परंतु त्याला नंतर त्या सदस्य पदावरून बाजूला करून इस्लामच्या प्रचारासाठी मोकळे सोडण्यात आले होते. त्याची आणि ठाणे-मुंबऱ्यातील शहानवाज मकसूद खान याची ओळख झाली आणि त्यांनी वेगवेगळे मोबाईल गेम्स सापळे रचले. त्यात एक जैन मुलगा अडकला. त्या मुलाची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा मोबाईल गेम जिहादचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

    Mobile Game Jihad; Jain listening to Zakir Naik’s speeches

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य