पोलिसांसमोर जमाव आम्हाला मारहाण करत होता, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे पीडितांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये पुन्हा एकदा मॉब लिंचिंगची खळबळजनक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील अलवरमध्ये लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या एका समाजातील तीन तरुणांना जमावाने घेरून बेदम मारहाण केली. जमावाच्या बेदम मारहाणीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित दोन तरुणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Mob lynching again in Rajasthan three youths beaten to death in Alwar one dead
खरेदी केलेले लाकूड घेण्यासाठी एका समाजातील तीन मुले आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वन कर्मचाऱ्यांच्या वाहनात 10-12 जण आले आणि त्यांनी त्यांना घेराव घातला. गावकऱ्यांनी जेसीबी लावून त्यांना थांबवले आणि काहीही न बोलता मारामारी सुरू केल्याचा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण जास्त लोक असल्याने ते आम्हाला मारत राहिले. आमच्या एका सहाकाऱ्यास जास्त मारहाणीमुळे जीव गमवावा लागला.
पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोपही पीडित तरुणाने केला. पोलिसांसमोर जमाव आम्हाला मारहाण करत होता, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे पीडितांनी सांगितले. अलवरमधील हरसोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने पोलिसात एफआयआर दाखल केला आहे.
Mob lynching again in Rajasthan three youths beaten to death in Alwar one dead
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर
- भारताकडून ‘या’ देशाने मागवला १ लाख टन तांदूळ, टोमॅटो पाठवल्यानंतर केली ही विनंती!
- सारेगामापा लिटल चॅम्प मुग्धा वैशंपायनच्या केळवणाचा थाट ; मुग्धाने आजोळचा केळवण म्हणत शेअर केली पोस्ट
- सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये जात सर्वेक्षणावर तत्काळ बंदी घातली, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान