Mob Accuses Pastor Of Conversion : बळजबरी धर्मांतरण केल्याच्या आरोपावरून एका ख्रिश्चन धर्मगुरूला आज रायपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये जमावाने बेदम मारहाण केली. पाद्रीला जेव्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले तेव्हा पोलीस स्टेशनच्या आवारात संतप्त जमाव आणि पाद्रीसोबत असलेल्या लोकांमध्ये बाचाबाची झाली. ही घटना रायपूरच्या जुन्या बस्ती पोलीस ठाण्यातील आहे. भाटगाव परिसरात जबरदस्तीने धर्मांतराची तक्रार पोलिसांना मिळाली होती. काही स्थानिक हिंदुत्ववादी नेत्यांनीही काही वेळातच पोलीस स्टेशन गाठले. Mob Accuses Pastor Of Conversion, Thrash Him In Front Of Cops At Police Station In Raipur
विशेष प्रतिनिधी
भोपाल : बळजबरी धर्मांतरण केल्याच्या आरोपावरून एका ख्रिश्चन धर्मगुरूला आज रायपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये जमावाने बेदम मारहाण केली. पाद्रीला जेव्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले तेव्हा पोलीस स्टेशनच्या आवारात संतप्त जमाव आणि पाद्रीसोबत असलेल्या लोकांमध्ये बाचाबाची झाली. ही घटना रायपूरच्या जुन्या बस्ती पोलीस ठाण्यातील आहे. भाटगाव परिसरात जबरदस्तीने धर्मांतराची तक्रार पोलिसांना मिळाली होती. काही स्थानिक हिंदुत्ववादी नेत्यांनीही काही वेळातच पोलीस स्टेशन गाठले.
तक्रारदार संतप्त होते आणि त्यांनी धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत पोलीस स्टेशनला घेराव घातला. भाटगाव परिसरातील ख्रिश्चन समाजाच्या इतर काही सदस्यांसह पाद्रीच्या आगमनामुळे जमाव आणि चौकशीसाठी बोलावलेल्यांमध्ये वाद झाला.
यानंतर पाद्रीला स्टेशन प्रभारींच्या खोलीत नेण्यात आले, तेथे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संतप्त जमावाने पाद्रीवर हल्ला केला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये काही जण पाद्रीला चप्पल आणि बुटाने मारत असल्याचे दिसून आले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक (शहर) तारकेश्वर पटेल म्हणाले, “आम्हाला यापूर्वी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नव्हती. दोन गटांमधील मारामारीदरम्यान पोलीस ठाण्याचे कोणतेही नुकसान झाले नाही. आता आम्ही तक्रारीची (धर्मांतरणाची) चौकशी करत आहोत. तपासाच्या आधारे आम्ही कारवाई करू.”
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Mob Accuses Pastor Of Conversion, Thrash Him In Front Of Cops At Police Station In Raipur
महत्त्वाच्या बातम्या
- Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची याचिका नाकारली, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश
- BOM Recruitment 2021 : पदवीधर तरुणांना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
- मोठी बातमी : DCGIची कोरोनावरील प्रभावी औषध TOCIRA ला मंजुरी, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठीही वापरता येईल
- पवार – वळसे यांच्या कार्यक्रमांना गर्दी; मुख्यमंत्र्यांची तंबी; आता राष्ट्रवादीला गर्दी टाळण्याची उपरती
- थलायवीची वाट पाहत असलेल्या कंगना राणावतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी हिंदीमध्ये प्रदर्शित होणार