• Download App
    राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या खासदारास योगींनी समज दिल्याचा मनसेचा दावा MNS claims that Yogi gave slams MP who opposed Raj Thackeray

    राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या खासदारास योगींनी समज दिल्याचा मनसेचा दावा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या भेटीपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा देणारे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समज दिली आहे आणि आता ते शांत बसतील असा दावा मनसेच्यावतीने करण्यता आला आहे. त्यामुळे राज ठाकरे अयोध्येला जाणारच असल्याचेही म्हटले आहे. MNS claims that Yogi gave slams MP who opposed Raj Thackeray


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या भेटीपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा देणारे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समज दिली आहे आणि आता ते शांत बसतील असा दावा मनसेच्यावतीने करण्यता आला आहे. त्यामुळे राज ठाकरे अयोध्येला जाणारच असल्याचेही म्हटले आहे.



    उत्तर भारतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांची भूमिका आहे. त्यांनी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण सिंह यांनी दिला होता. मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी पत्रकारांना सांगितले, की मनसे लहानमोठ्या धमक्यांना भीक घालत नाही.

    ब्रिजभूषण सिंह यांनी प्रसिद्धीसाठी हा प्रकार केला आहे. मात्र त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन गेला असून त्यांना शांत बसायला सांगितले आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह शांत होतील.

    MNS claims that Yogi gave slams MP who opposed Raj Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक