विशेष प्रतिनिधी
बीड : राजकारणात मोठ्याने कुठे थांबायचे हे ठरवायला पाहिजे. शरद पवारांनीसुद्धा वेळीच थांबायला पाहिजे होते, असे अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके ( MLA Prakash Solanke )यांनी सांगितले. सोमवारी त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे आमदार सोळंके यांनी रविवारीच राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे.
आमदार सोळंके यांनी पुतण्या जयसिंह सोळंके हेच आगामी राजकीय वारसदार असतील, असे सांगितले. या घोषणेनंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगावात माध्यमांशी बोलताना राजकीय निवृत्तीचे कारण सांगत शरद पवार यांना टोला लगावला. मी पाच वर्षांपूर्वीच पुतणे जयसिंह सोळंके हेच राजकीय वारसा चालवतील असे जाहीर केले होते. पवार साहेबसुद्धा वेळीच थांबले असते तर त्यांच्या घरामध्ये जे घडले ते घडले नसते असे मला वाटते, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना सल्ला दिला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे घडले ते मी कधी बघितले नव्हते. मात्र येणाऱ्या काळामध्ये लोकसभेत जे घडले ते विधानसभेला घडणार नाही, असेही आमदार सोळंके म्हणाले.
मुलांना राजकारणात यायचे नाही
मी राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी मी सगळ्या यंत्रणेमध्ये असणार आहे. मला दोन मुले आहेत, मात्र त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. मुलीलादेखील नाही, म्हणूनच राजकीय वारस म्हणून पुतण्या जयसिंह हाच पर्याय होता, असे स्पष्टीकरण आमदार सोळंके यांनी दिले.
MLA Prakash Solanke
महत्वाच्या बातम्या
- Jammu and Kashmir : ‘जम्मू-काश्मीरमध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार’ केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती!
- West Bengal : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेत पहिल्यांदाच भाजप आणि तृणमूलचे झाले एकमत
- Raj Thackeray : राज ठाकरेंनी बोलायची तयारी दाखवली तरी मराठा आंदोलकांचा राडा; मनोज जरांगेंच्या नावाने घोषणा!!
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार, दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला!