विशेष प्रतिनिधी
आटपाडी : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे बंधू ब्रह्मानंद यांनी जमिनीच्या व्यवहारात आणि शेतीसाठी घेतलेल्या पाण्याचा माेबदला न देता १४ लाख ७५ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणूक व ॲट्राॅसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. झरे (ता. आटपाडी) येथील महादेव आण्णा वाघमारे (७७) या ज्येष्ठ शेतकऱ्याने पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.MLA Gopichand Padalkar and his brother were charged with atrocity and fraud
वाघमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मी आणि माझी बहीण शांताबाई कदम, मृत बहीण वनिता खरात हिच्या मुली मंजुश्री खरात, मनीषा सोनावणे, मुलगा धनंजय खरात यांच्या मालकीची झरे हद्दीत २६ गुंठे जमीन आहे. पडळकर व जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांनी ती जमीन कुलमुखत्यारपत्राच्या आधारे २१ मार्च २०११ रोजी माझ्याकडून खरेदी केली.
त्यापूर्वी २००८ मध्ये झालेल्या तोंडी व्यवहारात १० लाख ५० हजारात व्यवहार ठरला हाेता. तेव्हा पडळकर बंधूंनी एक लाख रुपये दिले. २०११ मध्ये खरेदी करत असताना मुद्रांक शुल्क चुकविण्यासाठी जमिनीची किंमत कमी दाखविली. प्रत्यक्षात वेळोवेळी चार लाख व दस्तावेळी ७५ हजार, असे एकूण पाच लाख ७५ हजार रुपये दिले. त्यानंतर उर्वरित ४ लाख ७५ हजार रुपये दिलेले नाहीत.
याशिवाय पडळकर बंधू १२ एकर क्षेत्रासाठी वाघमारे यांच्या विहिरीतील पाणी काेणताही माेबदला न देता वापरत आहेत. या पाण्यासाठी वर्षाला एक लाख रुपये यानुसार १० लाख देणे बाकी आहे. ते व जमीन व्यवहारातील ४ लाख ७५ हजार अशी एकूण १४ लाख ७५ हजार रुपयाची फसवणूक पडळकर बंधूंनी केल्याचे वाघमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
MLA Gopichand Padalkar and his brother were charged with atrocity and fraud
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी, एकाच दिवसात दहा लाख बाधित
- त्यांचे पूर्वज म्हणालयचे आम्ही अॅक्सीडेंटल हिंदू, योगी आदित्यनाथ यांचा राहूल गांंधींवर निशाणा
- गडकरी प्रेमाची राजकीय बौद्धिक दिवाळखोरी!!
- भाऊरायांची भाजपमध्ये जाण्याची चर्चा, ममता बॅनर्जींनी वहिनीसाहेबांना आणले राजकारणात
- डिजीटल इंडियाचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार ,अर्थव्यवहारांसाठी यूपीआयचा पर्याय, ४५६ कोटी व्यवहारांची वर्षात नोंद