• Download App
    जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाचे अंत्यसंस्कार थांबले, 38 पत्नींचे पती जियोना चाना जिवंत असल्याचा कुटुंबाचा दावा । Mizoram Ziona Chana family believe that he is Still Alive, Holds Funeral

    जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाचे अंत्यसंस्कार थांबले, 38 पत्नींचे पती जियोना चाना जिवंत असल्याचा कुटुंबाचा दावा

    Mizoram Ziona Chana family :  जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख (167 जण) मिझोराममधील जियोना चाना यांचा मृत्यू झालाय यावर त्यांचे कुटुंबीय विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. कुटुंबाचे मानणे आहे की, चाना अजूनही जिवंत आहेत आणि ते अजूनही श्वास घेत आहेत. या घटनेनंतर चाना यांचे अंत्यदर्शन थांबविण्यात आले आहे. Mizoram Ziona Chana family believe that he is Still Alive, Holds Funeral


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख (167 जण) मिझोराममधील जियोना चाना यांचा मृत्यू झालाय यावर त्यांचे कुटुंबीय विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. कुटुंबाचे मानणे आहे की, चाना अजूनही जिवंत आहेत आणि ते अजूनही श्वास घेत आहेत. या घटनेनंतर चाना यांचे अंत्यदर्शन थांबविण्यात आले आहे.

    चाना हे पावल संप्रदायाचे नेते आहेत. त्याच्या वडिलांनी हा पंथ तयार केला होता. या पंथात 433 कुटुंबे आणि 2,500 हून अधिक लोक आहेत. पंथाचे लोक म्हणतात की, जोपर्यंत मृत्यूची खात्री होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत.

    डॉक्टरांनी 2 दिवसांपूर्वीच मृत्यूची खात्री केली

    मिझोरामची राजधानी असलेल्या एझोलजवळमधील ट्रिनिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी 13 जून रोजी चाना यांच्या मृत्यूला दुजोरा दिला. ते 76 वर्षांचे होते. चाना हे व्यवसायाने सुतारकाम करायचे. त्यांना 38 पत्नी आणि 89 मुले आहेत. मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनीही सोशल मीडियावर चाना यांच्याबद्दल एक पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिले की, मिझोराम आणि त्यांचे गाव, बकटावंग तलंगनुम या कुटुंबामुळे पर्यटकांचे आकर्षण बनले होते.

    थोरल्या पत्नीवर कामाच्या वाटपाची जबाबदारी

    या कुटुंबाबद्दल सांगण्यात येते की, चाना यांची सर्वात मोठी पत्नी घरातील सर्व सदस्यांना कामांचे वाटप करते. प्रत्येकाच्या कामावरही ती लक्ष ठेवते. 167 जणांचे हे कुटुंब टेकड्यांच्या दरम्यान बांधण्यात आलेल्या एका 4 मजल्यांच्या मोठ्या घरात राहते. छौन थर रन (न्यू जनरेशन होम) असे या घराचे नाव आहे. या घरात 100 हून अधिक खोल्या आहेत.

    असे आहे कौटुंबिक जीवन

    चाना यांचा जन्म 21 जुलै 1945 रोजी झाला होता. ते चाना पावल नावाच्या समुदायाचे प्रमुख होते. संप्रदायाची स्थापना त्यांच्या वडिलांनी केली होती. या पंथात अनेक बहुपत्नित्वाची परंपरा आहे. हेच कारण आहे की, चाना यांना 38 बायका आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या कुटुंबाचे नाव समाविष्ट आहे. त्यांचे कुटुंब सुतारकाम करते.

    पत्नींकडे स्वयंपाक, तर सुनांकडे स्वच्छता

    रिपार्टनुसार, या कुटुंबाला दिवसाला 45 किलो तांदूळ, 25 किलो डाळी, 20 किलो फळे, 30 ते 40 कोंबड्या आणि 50 अंडी लागतात. चाना यांच्या कुटुंबासाठी, मोठ्या डायनिंग हॉलमध्ये 50 टेबल्सवर जेवण दिले जाते. चाना यांच्या बायका स्वयंपाक करतात. तर मुली घरातील इतर कामे करतात. साफसफाईची जबाबदारी सुनांवर आहे.

    Mizoram Ziona Chana family believe that he is Still Alive, Holds Funeral

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!