• Download App
    MITALI RAJ : जबरदस्त! ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राजचे राज्य ; अव्वल नंबर मितालीसह दक्षिण अफ्रिकेच्या लिजेली लीची बाजी। MITALI RAJ: Great! Mithali Raj's state in ICC ODI rankings; South Africa's Lizzie Lee's match with top number Mithali

    MITALI RAJ : जबरदस्त! ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राजचे राज्य ; अव्वल नंबर मितालीसह दक्षिण अफ्रिकेच्या लिजेली लीची बाजी

    वृत्तसंस्था

    दुबई : मंगळवारी (१४ सप्टेंबर) जाहीर झालेल्या आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज हिने तिचे स्थान कायम राखले आहे. ती पहिल्या क्रमांकावर कायम आहे. या यादीमध्ये पहिले स्थान मिळवण्यासाठी मितालीला दक्षिण अफ्रिकेच्या लिजेली ली हिने चांगलेच आव्हान दिले. तिने यादीमध्ये मोठे अंतर पार करत मितालीसोबत संयुक्तपणे पहिले स्थान मिळवेले आहे. लिजेलीचे पाॅईंट्सही मिताली एवढेच आहेत. दोघी ७६२ पाॅईंट्ससह पहिल्या स्थानावर आहेत. MITALI RAJ: Great! Mithali Raj’s state in ICC ODI rankings; South Africa’s Lizzie Lee’s match with top number Mithali

    वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दणदणीत अर्धशतक झळकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिजेल ली हिने मंगळवारी जाहीर झालेल्या नव्या आयसीसी एकदिवसीय फलंदाज क्रमवारीत भारताच्या मिताली राजसोबत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले.

    लीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ९१ धावांची दमदार खेळी केली. मिताली आणि ली यांचे प्रत्येकी ७६२ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाची एलिसा हीली तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. तसेच भारताची सलामीवीर स्मृती मानधना नवव्या स्थानी आहे. जून २०१८ मध्ये पहिल्यांदा क्रमवारीत स्थान पटकावलेल्या लीने मार्च महिन्यातही अव्वल स्थान पटकावले होते.

    गोलंदाजी क्रमवारीत अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी आणि फिरकीपटू पूनम यादव अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत. तसेच अष्टपैलू क्रमवारीत दीप्ती शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे. टी-२० क्रमवारीत शेफाली वर्मा अव्वल स्थानी असून तिच्यानंतर ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी (७४४) आणि स्मृती मानधना (७१६) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.

    MITALI RAJ: Great! Mithali Raj’s state in ICC ODI rankings; South Africa’s Lizzie Lee’s match with top number Mithali

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट