• Download App
    स्टेरॉइड्सच्या अतिवापरामुळे म्युकोरमायकोसिसचा फैलाव; कोविडपेक्षा फंगल – बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक; डॉ. रणदीप गुलेरिया यांचा खुलासा Misuse of steroids is a major cause behind this infection (Mucormycosis), AIIMS Director Randeep Guleria

    स्टेरॉइड्सच्या अतिवापरामुळे म्युकोरमायकोसिसचा फैलाव; कोविडपेक्षा फंगल – बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक; डॉ. रणदीप गुलेरिया यांचा खुलासा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – कोरोना फैलाव रोखण्यासाठी स्टेरॉइड्सचा अर्थात संप्रेरकांचा वापर केला जातोय. पण त्यांच्या अतिरेकी वापरामुळेच म्युकोरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा फैलाव वाढतो आहे, असा इशारा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्सचे) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. Misuse of steroids is a major cause behind this infection (Mucormycosis), AIIMS Director Randeep Guleria

    कोरोना केसेस वाढताहेत हे तर सत्यच आहे. त्यासाठी कोविड प्रोटोकॉल फॉलो केले पाहिजेत. पण आता वैद्यकीयदृष्ट्या असे लक्षात येते आहे, की कोरोनापेक्षा अन्य फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक होत चालले आहे, याकडे डॉ. गुलेरिया यांनी लक्ष वेधले.



    म्युकोरमायकोसिस ही बुरशी अन्न, हवा, पाणी यांच्यात फार थोड्या प्रमाणात आढळते. त्याचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे त्याचे इन्फेक्शन फारसे आढळत नाही. कोविड फैलावाच्या आधी म्युकोरमायकोसिस इन्फेक्शनच्या केसेस फारच कमी होत्या. पण कोविडनंतर त्याचे प्रमाण फार वाढले आहे. मधूमेहाच्या पेशंटमध्ये हे प्रमाण वाढते आहे. स्टेरॉइड्सचा अतिरिक्त वापर हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

    सध्या एम्समध्ये याच्या २३ पेशंटवर उपचार सुरू आहेत. अन्य राज्यांमधून ५०० च्या वर केसेस आढळल्या आहेत. म्युकोरमायकोसिस आजाराचा परिणाम चेहरा, नाक, डोळ्यांच्या कडा आणि मेंदूवरही होऊ शकतो. यामुळे दृष्टीहीनत्व येऊ शकते, अशी माहितीही त्यांनी दिली.

    Misuse of steroids is a major cause behind this infection (Mucormycosis), AIIMS Director Randeep Guleria

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार