• Download App
    Mission Trishul Triumph मिशन त्रिशूळची कमाल, बिहारमध्ये एनडीएच्या विजयात आरएसएसची भूमिका ठरली महत्वाची

    बिहारमध्ये एनडीएच्या विजयात आरएसएसची भूमिका ठरली महत्वाची : मिशन त्रिशूळची कमाल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: बिहार विधानसभेच्या 2025 च्या निवडणुकीत एनडीएने मिळवलेला विक्रमी विजय हा जरी भाजप, जेडीयू, एलजेपी (आरव्ही) व इतर सहयोगी पक्षांच्या संयुक्त प्रचारामुळे दिसत असला, तरी याचा पाया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घातला होता. अनेक वर्षांपासून सामाजिक कामांद्वारे तयार केलेले संघाचे जाळे, सूक्ष्म नियोजन आणि बूथस्तरावरील व्यवस्थापन या विजयानंतर आता प्रकाशझोतात आले आहे.

    विविध माध्यमांनुसार, आरएसएसने बिहारमधील सर्व 38 जिल्ह्यांमध्ये किमान 100 स्वयंसेवक तैनात केले होते. यासोबतच देशभरातील विद्यापीठांमधून जवळपास 5000 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते पाच-पाच जणांच्या टीममध्ये बिहारमध्ये दाखल झाले. हे कार्यकर्ते पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क ठेवत होते. विशेषतः मतदानाच्या पहिल्या टप्प्यापूर्वी शेवटचे दोन आठवडे अतिशय निर्णायक ठरले.

    या एकत्रित प्रयत्नांमुळे एनडीएला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मत मिळाले. 2020 मध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर लढलेले काही छोटे पक्षही यावेळी एनडीएमध्ये सहभागी होते. त्यांना एकत्र आणून आरएसएसने सर्वच उमेदवारांना समान मदत केली.



    मतांमध्ये मोठी वाढ
    मागील निवडणुकीपेक्षा या वेळेस मतांमध्ये मोठी वाढ झाली

    भाजप: 42.56% वरून 48.44%

    जेडीयू: 32.83% वरून 46.2%

    एलजेपी (आरव्ही): 10.26% वरून 43.18%

    HAM (S): 32.28% वरून 48.39%

    RLM: 4.41% वरून 41.09%

    बिहारमधील निवडणुका पारंपरिकरित्या जातीय समीकरणांवर आधारित असतात. पण आरएसएसच्या घराघरातील मोहिमेत “परफॉर्मन्स आणि विकास” हे मुख्य थीम ठेवून, जातीय चौकटी मोडण्याचे प्रयत्न करण्यात आले. “सुषासन आणि विकास” यावर जनमत तयार करण्यात संघ कार्यकर्त्यांनी मोठी भूमिका बजावली.

    सीमांचल हा मुस्लिम बहुल प्रदेश असून, मागील काही वर्षांत RSSने येथे सामाजिक कामाच्या माध्यमातून मजबूत पायाभूत काम केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे मुस्लिम बहुल 32 जागांपैकी एनडीएने 21 जागांवर विजय मिळवला. BJP: 10, JD(U): 8, LJP(RV): 2 आणि RLM: 1ला एक जागा मिळाली. 2020 च्या तुलनेत ही कामगिरी अधिक प्रभावी ठरली.

    भाजपच्या अल्पसंख्याक मोर्च्यानेही घराघरात जाऊन उजबळा, आवास योजना आणि इतर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देत मुस्लिम मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

    फेब्रुवारी पासून RSSने “मिशन त्रिशूळ” या खास मोहिमेची आखणी केली होती. संघप्रमुख मोहन भागवत यांच्या पातळीवर या मोहिमेचे निरीक्षण झाले असल्याची माहिती निवडणूक सूत्रांनी दिली आहे. यात तीन पायऱ्या होत्या. स्वयंसेवकांनी गावोगावी जाऊन बेरोजगारी, स्थानिक समस्या, भ्रष्टाचार, सुविधा यांसारख्या असंतोषाचे मुद्दे नोंदवले. स्थानिक प्रश्नांना राष्ट्रीय कथानकाशी जोडणे. मतदारांना स्थानिक समस्यांबरोबर “विकास, राष्ट्रहित आणि स्थैर्य” याची सांगड घातली.

    जातीय मतभेद दूर करून बुथ-स्तरावर ओबीसी, दलित आणि सवर्ण मतदारांना एकत्र आणण्याचे प्रयत्न. अभाविप, बजरंग दल, विहिप आणि मजदूर संघ यांची ही मदत निर्णायक ठरली.

    Mission Trishul Triumph: RSS’s Silent Push Powered NDA’s Big Bihar Win

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Minister Mangal Prabhat Lodha : मंत्री मंगल प्रभात लोढा यांना काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदाराकडून धमकी; अतिक्रमण कारवाईतून वाद; पोलिसांत तक्रार

    Tejas Crash, : तेजस विमान अपघातात हिमाचल प्रदेशचे विंग कमांडर शहीद; उड्डाण सराव करत होते नमन स्याल; पत्नीही हवाई दलात अधिकारी

    SC SIR Petition : SIR विरुद्ध याचिका, सुप्रीम कोर्टाने ECकडून मागितले उत्त ; केरळ सरकारची कार्यवाहीला स्थगितीची मागणी