- मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेचा ग्रँड फिनाले स्थगित
- 17 स्पर्धकांना झाली कोरोनाची लागण
- या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मनसा वाराणसी करणार
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असताना कोरोनाचा शिरकाव मिस वर्ल्ड स्पर्धेतही झाला आहे. मिस वर्ल्ड 2021 मधील स्पर्धक आणि भारतीय मॉडेल मानसा वाराणसी हिला कोरोना संसर्ग झाला आहे. तिच्याशिवाय आणखी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेचा विचार करून मिस वर्ल्ड 2021 स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. Miss World 2021 temporarily postpones global broadcast finale in Puerto Rico due to health and safety interest of contestants, staff
गुरुवारी हा इव्हेंट सुरू होण्याच्या काही तास आधी याबाबतची घोषणा करण्यात आली. मिस वर्ल्ड 2021 ही स्पर्धा दक्षिण अमेरिकेत सुरु आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या स्पर्धकांना द. अमेरिकेच्या Puerto Rico मध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. इथेच या स्पर्धेचा फिनालेही होणार होता.
मात्र, आता ग्रँड फिनालेचा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून त्याचं नवं वेळापत्रक तयार केलं जाईल.
ही स्पर्धा पुढील 90 दिवसात पुन्हा आयोजित केली जाईलं असं मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करणाऱ्या संघटनेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘स्पर्धकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात घेऊन मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने मिस वर्ल्ड फिनाले पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.’
मिस इंडिया ऑर्गनायझेशनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर म्हटलं आहे की, ‘आम्हाला विश्वास बसत नाही की, तिच्या (मानसा वाराणसी) अथक परिश्रम आणि समर्पणानंतरही ती जागतिक मंचावर चमकू शकणार नाही. मात्र तिची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.’
मिस वर्ल्ड स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक स्पर्धकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आरोग्य अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर स्पर्धकांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल.
Miss World 2021 temporarily postpones global broadcast finale in Puerto Rico due to health and safety interest of contestants, staff
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीची नजर; लोकलच्या प्रवासात गुन्हेगारीला आळा
- शिवसेना आमदारांची तक्रार खरीच; आमदार निधी वाटपात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी चौपट!!; काँग्रेसचीही सेनेवर आघाडी
- बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!; भारताने पुन्हा दिले बांधून!!
- पिंपरी : मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड ; राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना घडला प्रकार