विशेष प्रतिनिधी
मिर्झापूर : मिर्झापूर ही ऍमेझॉन प्राइमवरील वेबसीरिज खूप प्रसिध्द आहे. मिर्झापूर सिरीज आणि गँगस्टर्स, त्यातले डायलॉग्स सर्वकाही लोकांना प्रचंड आवडते. पण सध्या मिर्झापुरी हे नाव एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. मिर्झापूर मधील एका शाळेमधील पाच वर्षाच्या मुलाला शिक्षकांनी पनिशमेंट म्हणून दुसर्या मजल्यावरून खाली लोंबकळत ठेवले होते.
Mirzapur police have arrested a teacher for hanging a five-year-old boy as punishment
ही अमानवीय आणि क्रूर शिक्षा देत असतानाचा फोटो इंटरनेटवर काल व्हायरल झाला होता. रविष कुमार यांनी देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवरून हा फोटो शेअर करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. इंटरनेटवर हा फोटो व्हारल झाल्यानंतर बरीच मोठी टीका केली गेली होती.
शाळेवर आणि त्या शिक्षकांवर योग्य ती कारवाई केली जावी. तसेच तेथील मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकांना निलंबित केले जावे. अशी मागणी ट्विटरवरून बऱ्याच लोकांनी केली होती. आता मिर्झापूर पोलिसांनी त्या संबंधित शिक्षकांना अटक केली आहे.
Mirzapur police have arrested a teacher for hanging a five-year-old boy as punishment
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सात बेड्या तोडून हिंदुत्वाला सबळ केले; रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
- शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत , कोकणात झाला करेक्ट कार्यक्रम
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात , ‘ या ‘ दिवशी मिळणार बोनससह DA च्या थकबाकीचे पैसे