• Download App
    ‘मिर्झापूर’चा अभिनेता विकतोय रामलड्डू ; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल।'Mirzapur’ actor Selling Ramaldu; The photo viral on social media

    ‘मिर्झापूर’चा अभिनेता विकतोय रामलड्डू ; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजमधील अभिनेता राजेश तैलंग यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते चक्क रस्त्यावर रामलड्डू विकताना दिसत आहेत. ‘Mirzapur’ actor Selling Ramaldu; The photo viral on social media

    गुड्डूभैया म्हणजे अभिनेता अली फझलच्या वडिलांची भूमिका त्यांनी साकारली आहे. ‘‘लॉकडाऊन संपेल, कोरोना जाईल आणि तेव्हा पुन्हा कामाला नव्याने सुरुवात करू,’’ अशी कॅप्शन त्यांनी फोटोला दिली.



    मिर्झापूर या वेबसिरीजच्या दोन्ही भागांमध्ये राजेश तैलंग यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ती प्रचंड गाजली आहे. सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमधून लॉकडाऊन दरम्यान कलाकारांचे होत असलेले हाल सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आतापर्यंत अनेक कलाकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यांनी सोशल मीडियावरून त्यांची व्यथा मांडली होती. दरम्यान, राजेश यांचा फोटो पाहून चाहते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहींना हा फोटो त्यांच्या आगामी चित्रपटातील असल्याचे वाटत आहे तर काहींना राजेश यांच्यावर कोसळलेल्या आर्थिक संकटाचा असल्याचे वाटत आहे.

    ‘Mirzapur’ actor Selling Ramaldu; The photo viral on social media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Aging : 2036 पर्यंत प्रत्येक 7 पैकी 1 भारतीय ज्येष्ठ नागरिक असेल; केंद्रीय मंत्री म्हणाले- लोकसंख्या वेगाने वृद्ध होत आहे

    IMF Loan : IMF ने पाकिस्तानला ₹11,000 कोटींचे कर्ज दिले; जगभरातील वाईट परिस्थितीतही अर्थव्यवस्था स्थिर ठेवल्याचा दावा

    NIA Finds : दिल्लीतील बॉम्बस्फोटापूर्वी काश्मिरी जंगलात चाचणी; ‘एनआयए’कडे पुरावे, कटाच्या मुळापर्यंत पोहोचणार