BH Series Registration Mark : आता वाहन मालकांना त्यांचे वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. केंद्र सरकारने कोणतीही नोंदणी न करता “बीएच-सीरिज” वाहने कोणत्याही व्यत्ययाशिवाय हस्तांतरित करण्यासाठी मंजुरी दिली आहेत. Ministry of Road Transport and Highways Introduced New BH series registration mark for new vehicles
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आता वाहन मालकांना त्यांचे वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. केंद्र सरकारने कोणतीही नोंदणी न करता “बीएच-सीरिज” वाहने कोणत्याही व्यत्ययाशिवाय हस्तांतरित करण्यासाठी मंजुरी दिली आहेत.
यामुळे वाहन मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट होतो तेव्हा वाहनासाठी नवीन रजिस्ट्रेशन मार्क घेण्याची गरज भासणार नाही. तथापि, यासाठी तुमच्या आपल्या वाहनामध्ये नवीन बीएच सीरीज नोंदणी चिन्ह असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या नवीन सुविधेचा लाभ घेऊ शकाल. यामुळे पुन्हा नोंदणीच्या त्रासापासून तुमची सुटका होईल.
आता बाजारात दाखल होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना बीएच मार्क दिले जातील. जर तुमच्याकडे या मालिकेचे वाहन असेल, तर तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन मार्क घेण्याची गरज भासणार नाही. सर्व बीएच सीरीजची वाहने या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. ही वाहने दुसऱ्या राज्यात चालवण्यासाठी तुम्हाला आटापिटाही करावा लागणार नाहीत.
सरकारचे नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन हे पाऊल उचलले आहे. आतापर्यंत एखादे वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर व्हायचे, तेव्हा ते पुन्हा नोंदणी करणे आवश्यक होते, परंतु आता बीएच सीरीजच्या नवीन वाहनांसह अशी कोणतीही समस्या येणार नाही.
हा नवीन नियम देखील खूप महत्वाचा आहे कारण मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 47 नुसार, एखाद्या व्यक्तीला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट झाल्यावर नवीन नोंदणी मिळवण्यासाठी फक्त 12 महिन्यांची मुभा मिळते. परंतु नवीन निर्णयामुळे नवीन राज्यात त्यांना वाहन चालवण्यात अडचण येणार नाही.
Ministry of Road Transport and Highways Introduced New BH series registration mark for new vehicles
महत्त्वाच्या बातम्या
- KBC 13 First Crorepati : सीझनची पहिली ‘करोडपती’ ठरली हिमानी बुंदेला, यशासाठी 10 वर्षे केले प्रयत्न
- नवज्योत सिंग सिद्धू यांच्या आक्रमक भाषणापुढे काँग्रेस हायकमांड हतबल; हरीश रावत म्हणाले “ते” काही बंडखोर नाहीत!!
- काबूलनंतर दहशतवाद्यांची नजर आता भारतावर; अल कायदा, इसिस के, हक्कानी नेटवर्ककडून दिल्लीसह उत्तर भारतात घातपाताचा गुप्तचर अलर्ट
- किती असते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन?, काय सुविधा मिळतात?; जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर?, प्रलंबित ओबीसी आरक्षणामुळे ठाकरे सरकार निर्णय घेण्याची शक्यता