• Download App
    कोविन अ‍ॅपवरून डाटा लिक झाल्याचा आरोग्य मंत्रालयाचा इन्कार, नागरिकांचा सर्व डाटा सुरक्षित|Ministry of Health denies leaking data from Covin app, all data of citizens safe

    कोविन अ‍ॅपवरून डाटा लिक झाल्याचा आरोग्य मंत्रालयाचा इन्कार, नागरिकांचा सर्व डाटा सुरक्षित

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: कोविन अ‍ॅपवरून नागरिकांचा डाटा लिक झाल्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इन्कार केला आहे. नागरिकांचा डाटा सुरक्षित आहे. या संदर्भात खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.Ministry of Health denies leaking data from Covin app, all data of citizens safe

    देशातील नागरिकांचे कोविड-१९ लसीकरण झाले आहे का याचा मागोवा घेण्यासाठी कोविन अ‍ॅप वापरले जाते. या पोर्टलवरील डाटा लिक झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. हा डाटा डार्क वेबवर उपलब्ध असल्याचेही म्हटले होते. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कथित डाटा लिक कोविन अ‍ॅपवरून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही.



    याचे कारण म्हणजे आम्ही लाभार्थ्यांचे पत्ते किंवा कोविड-19 स्थितीबद्दल कोणतीही माहिती संकलित करत नाही.सायबर गुन्हेगारांनी म्हटले आहे की त्यांनी गुगल सर्चमध्ये इंडेक्स केलेल्या सरकारी सर्व्हरवरून भारतातील हजारो लोकांचा डाटा कथितपणे चोरला आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

    त्यांचे मोबाइल नंबर, पत्ता आणि कोविड चाचणी निकाल त्यामध्ये आहेत. सुमारे २० हजार भारतीयांचा डाटा डार्क वेबवरील रेड फोरम वेबसाइटवर उपलब्ध आहे. हॅकरचा दावा आहे की ते थेट सरकारी सीडीएन सर्व्हरवरून येत आहेत.

    Ministry of Health denies leaking data from Covin app, all data of citizens safe

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे