प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे भारतावर तिसऱ्या लाटेचे संकट ओढवले आहे. दिल्ली, मुंबईसारख्या महत्वाच्या शहरात पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहेत. नागरिकांना बूस्टर डोस, मास्क लावणे तसेच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता आयुष मंत्रालयाने कोरोना महामारी रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.Ministry of AYUSH announces Ayurvedic remedies for corona prevention .
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सामान्य उपाय म्हणून दिवसभरात अनेक वेळा कोमट पाणी प्या, दिवसातून किमान ३० मिनिटे योग, प्राणायाम आणि ध्यान करा. हळद, जिरे, धणे अशा मसाल्यांचा जेवणात समावेश करावा. स्वयंपाक करताना लसूण वापरावा, असा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय:
- सकाळी १० ग्रॅम च्यवनप्राश अवश्य सेवन करा. मधुमेहींनी साखरमुक्त च्यवनप्राशचे सेवन करावे.
- तुळस आणि दालचिनीपासून बनवलेला हर्बल चहा प्या.
- दालचिनी, काळी मिरी, शुंथी (कोरडे आले) आणि मनुका (बेदाणे) – दिवसातून एकदा किंवा दोनदा खाणे आवश्यक आहे.
- गूळ आणि लिंबाचा रस याचे सेवन करणे आवश्यक आहे.
- गोल्डन मिल्क – १५० मिली कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळा आणि दिवसातून एक किंवा दोनदा प्या.
यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोनापासून तुमचे संरक्षण होण्यास मदत होईल, असे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Ministry of AYUSH announces Ayurvedic remedies for corona prevention .
महत्त्वाच्या बातम्या
- यूपीतली गळती रोखून भरतीसाठी अमित वाहनांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 10 तास मंथन; आजही पुन्हा बैठक!!
- WATCH : अमरावती पोलिसांच्या ताब्यामध्ये ५८ उंट कत्तलीसाठी राजस्थानातून तस्करीचा संशय
- WATCH : चिमुकलीने आईसोबतच सर केले ‘कळसूबाई शिखर’ अवघ्या साडेतीन तासांत मोहीम फत्ते
- WATCH : एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याचे अभिनंदन ; गोपीचंद पडळकर यांच्याकडून कौतुक
- नाशिक मध्ये पारा घसरलेलाच; राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद!!