• Download App
    मणिपूरवर बोलणाऱ्या गेहलोत सरकारला आरसा दाखवणाऱ्या राजेंद्र गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी! Minister Rajendra Gudha targeted the Ashok Gehlot government for criticizing Manipur so he was sacked from the post of minister

    मणिपूरवर बोलणाऱ्या गेहलोत सरकारला आरसा दाखवणाऱ्या राजेंद्र गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी!

    पावसाळी अधिवेशनात गेहलोत सरकारला मंत्र्यानेच दिला घरचा आहेर, जाणून घ्या काय म्हटले आहे

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : राजस्थानच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजेंद्र गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केली आहे. राजेंद्र गुडा यांनी आज पावसाळी अधिवेशनात सरकारचा समाचार घेतला होता. मणिपूरवर बोलण्यापूर्वी राजस्थानकडे बघावे, असं म्हणत त्यांनी गेहलोत सरकारला आरसा दाखवला होता. Minister Rajendra Gudha targeted the Ashok Gehlot government for criticizing Manipur so he was sacked from the post of minister

    आपल्याच सरकारवर निशाणा साधत मंत्री राजेंद्र गुढा यांनी म्हटले होते की, मणिपूरऐवजी आपण आपल्याच राज्यात डोकावले पाहिजे. मंत्री राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत आपल्याच सरकारवर निशाणा साधला आणि महिलांच्या सुरक्षेत आपण अपयशी ठरलो हे मान्य करावे, असे सांगितले होते. राजस्थानमध्ये ज्याप्रकारे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, हे पाहता मणिपूरऐवजी आपण स्वतःच्या राज्यात डोकावले पाहिजे. असे गुढा म्हणाले होते.

    राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा यांची हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांची ही शिफारस राज्यपालांनी तत्काळ प्रभावाने स्वीकारली आहे. आज राजेंद्र गुढा यांनी राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर आपल्याच सरकारवर टीका केली. यानंतर गेहलोत सरकारने ही कारवाई केली आहे.

    Minister Rajendra Gudha targeted the Ashok Gehlot government for criticizing Manipur so he was sacked from the post of minister

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!