वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदीय सभ्य वर्तनाच्या सर्व मर्यादा ओलांडून ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या पायऱ्यावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची मिमिक्री केली. त्यावर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर बडगा उगारण्याची शक्यता निर्माण होताच कल्याण बॅनर्जी गडबडले. आपला कोणालाही दुखवायचं हेतू नव्हता, असे ते म्हणाले, पण त्यावेळी त्यांची बॉडी लँग्वेज मात्र अतिशय कॅज्युअल आणि खिल्ली उडवण्याचीच होती. Mimikriveer MP Kalyan Banerjee says he doesn’t want to hurt anyone
कल्याण बॅनर्जी यांच्या या असभ्य मिमिक्रीची दखल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. द्रौपदी मुर्मू यांनी खासदारांना संसदीय सभ्यतेच्या मर्यादा जाणवून दिल्या. पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्रपतींना फोन करून आपण गेली 20 वर्षे असाच अपमान सहन करत आहोत. परंतु, कोणताही अपमान आपल्याला ध्येयपथावरून विचलित होऊ देणार नाही, असे सांगितले. उपराष्ट्रपतींनी देखील पंतप्रधानांना आपण संविधानाचे अनुसरण करताना कोणता अपमान रोखू शकणार नाही, असे आश्वस्त केले.
या पार्श्वभूमीवर संसद संकुलाच्या परिसरात पत्रकारांनी खासदार कल्याण बॅनर्जी यांना गाठले आणि त्यांची या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी त्यांनी आपला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, पण मिमिक्री ही एक कला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 ते 2019 मध्ये लोकसभेत अनेकांची मिमिक्री केल्याचे मी तुम्हाला दाखवू शकतो, असे सांगितले.
जगदीप धनखड हे वरिष्ठ वकील आहेत. आमच्या दोघांचाही प्रोफेशन एक आहे. ते पश्चिम बंगालचे गव्हर्नर होते आणि आता उपराष्ट्रपती आहेत. मला त्यांच्याविषयी आदर आहे, पण त्यांनी मी केलेली मिमिक्री उगाचच स्वतःवर ओढवून घेतली. ते खरंच राज्यसभेत असेच वर्तन करतात का?? ती आपलीच मिमिक्री आहे असे त्यांना का वाटले??, असा सवाल विचारत कल्याण बॅनर्जींनी पुन्हा एकदा उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवली. कल्याण बॅनर्जींची बॉडी लँग्वेज तसेच दाखवत होती. एएनआय वृत्तसंस्थेने कल्याण बॅनर्जींच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे.
Mimikriveer MP Kalyan Banerjee says he doesn’t want to hurt anyone
महत्वाच्या बातम्या
- अभिनेता शाहरुखची पत्नी गौरीला ईडीची नोटीस; तुलसियानी ग्रुपची ब्रँड ॲम्बेसेडर; 30 कोटींच्या फसवणुकीचा कंपनीवर आरोप
- इंडियाच्या बैठकीत PM उमेदवारासाठी ममतांनी सुचवले खरगेंचे नाव; केजरीवालांचे समर्थन; अखिलेश यांचे मौन
- दिल्ली विधेयक राज्यसभेत मंजूर, राष्ट्रपतींकडे जाणार; आतापर्यंत विरोधी पक्षाचे 141 खासदार निलंबित
- मुख्यमंत्री शिंदेंची विधिमंडळात घोषणा- फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन; 1967 पूर्वीच्या नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले