ममता बॅनर्जींकडे राजीनामा सुपूर्द केला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अभिनेत्री आणि तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्तीने आज संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर मिमी चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला. जाधवपूरच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी नुकताच संसदेच्या दोन स्थायी समित्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. याशिवाय त्यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या आरोग्य केंद्र संस्थेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. imi Chakraborty has announced her resignation as a Member of Parliament
मिमी चक्रवर्ती बऱ्याच दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या राजकारणासाठी वेळ देऊ शकत नव्हत्या. त्यामुळेच आपण राजकारणातून लवकर निवृत्त व्हावे अशी त्यांची इच्छा होती. अखेर आज त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला.
त्यांनी राजीनाम्याचे कारण सांगितले नसले तरी मिमी चक्रवर्तींना त्यांच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय TMAC मुद्द्यांवरही मिमी यांचे मतभेद असल्याची चर्चा आहे. त्याच महिन्यात बंगाली सिनेस्टार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार दीपक अधिकारी यांनीही टीएमसीला धक्का दिला होता. दीपक अधिकारी हे टॉलिवूडचा मोठे स्टार आहेत.