• Download App
    केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मिती 36 लाख दूध उत्पादकांच्या 'अमूल'ने मानले केंद्राचे आभार, आणखी एका सहकार क्रांतीचे केले स्वागत । Milk Brand Amul Ad Thanks Modi Government For Making Cooperative Ministry

    36 लाख दूध उत्पादकांच्या ‘अमूल’ने केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीवर मानले आभार, आणखी एका सहकार क्रांतीचे केले स्वागत

     Cooperative Ministry : सुप्रसिद्ध ‘अमूल’च्या जाहिरातीने सरकारच्या नवीन सहकार मंत्रालयाचे स्वागत केले आहे. दुसरीकडे, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनीही ही जाहिरात शेअर केली आहे. शनिवारी अमूलची ही जाहिरात देशातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि फेरबदलाच्या एक दिवस आधी मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापनेची घोषणा केली होती. हे खाते गृहमंत्री अमित शहा पाहणार आहेत. Milk Brand Amul Ad Thanks Modi Government For Making Cooperative Ministry


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सुप्रसिद्ध ‘अमूल’च्या जाहिरातीने सरकारच्या नवीन सहकार मंत्रालयाचे स्वागत केले आहे. दुसरीकडे, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनीही ही जाहिरात शेअर केली आहे. शनिवारी अमूलची ही जाहिरात देशातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि फेरबदलाच्या एक दिवस आधी मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापनेची घोषणा केली होती. हे खाते गृहमंत्री अमित शहा पाहणार आहेत.

    ‘सहकारातून समृद्धी’चे स्वप्न साकार करण्यासाठी मोदी सरकारने हे नवे मंत्रालय स्थापन केले आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात स्वतंत्र सहकार मंत्रालयाबाबत घोषणा केली होती. देशातील सहकारी चळवळ बळकट करण्यासाठी नवीन मंत्रालय स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट उपलब्ध करेल. यामुळे सहकार तळागाळातील पातळीवर पोहोचण्यास मदत होईल. या सहकारी संस्थांद्वारे सर्वसामान्यांना जोडता येईल.

    देशातील सहकार आधारित आर्थिक विकासाचे मॉडेल अत्यंत प्रासंगिक आहे. या मॉडेलमध्ये प्रत्येक सदस्य जबाबदारीच्या भावनेने कार्य करतो. मंत्रालय सहकारी संस्थांसाठी ‘व्यवसायात सुलभता’ म्हणजेच इज ऑफ डुइंग बिझनेसची प्रक्रिया सोपी करेल. हे मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह (एमएससीएस) चा विकास सक्षम करण्यासाठी कार्य करेल. को-ऑपरेटिव्हमध्ये जनतेतूनच लोक मिळून संस्था तयार करतात. ते सर्वसामान्य उद्दिष्टांसाठी काम करतात. जे काहीही असू शकते. उदाहरणार्थ दुग्धशाळा, शेती, बँकिंग, साखर कारखाना इ. अमूल हे त्याचे उदाहरण आहे. हे गुजरातच्या सहकारी संस्थेद्वारे चालविले जाते.

    मनोरंजक जाहिरात

    अमित शहा यांना शेतकरी आणि अमूलच्या जाहिरातीमध्ये ‘अमूल गर्ल’ सोबत दाखवले आहे. सरकारच्या नव्या सहकार मंत्रालयात त्यावर लिहिले आहे ‘आपके मूंह में घी शक्कर’ ही जाहिरात शेअर करत पीयुष गोयल यांनी लिहिले की, ‘सहकारातून होईल साकार, विकसित देश, आत्मनिर्भर समाज.’

    नुकतेच वाढवले दुधाचे दर

    अलीकडेच अमूलने त्यांच्या दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली होती. हे पाहून मदर डेअरीनेही दुधाचे दर वाढविले आहेत. त्यांनीही लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे.

    Milk Brand Amul Ad Thanks Modi Government For Making Cooperative Ministry

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार