• Download App
    हिंदूंची निवडून निवडून हत्या केली जाते, तेव्हा तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक मुग गिळून का गप्प बसतात, मिलिंद परांडे यांचा सवाल|Milind Parande asks why so-called secular people are silent when Hindus are killed selectively.

    हिंदूंची निवडून निवडून हत्या केली जाते, तेव्हा तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक मुग गिळून का गप्प बसतात, मिलिंद परांडे यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात हिंदूंचे पुनर्वसन आणि त्यांचा मुक्त संचारच दहशतवादाचा खात्मा करू शकतो, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले. जेव्हा हिंदूंची निवडून निवडून हत्या केली जाते, तेव्हा हे तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक मुग गिळून का गप्प बसतात, त्याची जीभ का शिवली जाते, असा सवाल त्यांनी केला आहे.Milind Parande asks why so-called secular people are silent when Hindus are killed selectively.

    काश्मीर खोऱ्यातील हिंदूंच्या निर्घृण हत्येचा निषेधार्थ शनिवारी बजरंग दलातर्फे देशव्यापी निषेधाचे आयोजन करण्यात आले आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या पाच दिवसांत सात हिंदूंची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, याबाबत परांडे म्हणाले की, जिहादी अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे.



    काश्मीर खोऱ्यात हिंदूंचे पुनवर्सन आणि त्यांच्या मुक्त संचाराची व्यवस्था केल्याशिवाय खोºयाती, दहशतवादाला लगाम बसू शकत नाही.हिंदूंच्या होणाºया हत्याकांडामुळे बजरंग दलाचे संतप्त कार्यकर्ते उद्या देशव्यापी निदर्शने करतील तसेच पाकिस्तानचा पुतळा जाळतील, असा इशारा परांडे यांनी दिला.

    दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांनी कितीही रक्तरंजित हिंसाचार केला तरी भारताचे तुकडे करण्यात ते कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी संपूर्ण देश कटिबद्ध आहे.

    जिहादी दहशतवादाला जशास तसे उत्तर देणे विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना चांगल्याप्रकारे माहीत आहे. यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता तयार आहे. विषारी सापांना कसे ठेचायचे, ते आम्हाला चांगले माहीत आहे.

    Milind Parande asks why so-called secular people are silent when Hindus are killed selectively.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य