ही घटना शुक्रवार २४ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. सरावासाठी उड्डाण सुरू असताना विमान कोसळले.MiG-21 fighter jet crashes in Jaisalmer; Wing Commander Harshit Sinha dies in accident
विशेष प्रतिनिधी
जैसलमेर : सीडीएस बिपीन रावत यांच्या विमानाच्या अपघातानंतर पुन्हा एकदा हवाईदलाच्या विमानाचा अपघात झाला आहे. पाकिस्तान सीमेजवळ राजस्थानमध्ये असलेल्या जैसलमेर जिल्ह्यात भारताचे मिग २१ लढाऊ विमान कोसळले.ही घटना शुक्रवार २४ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास घडली.
सरावासाठी उड्डाण सुरू असताना विमान कोसळले. या दुर्घटनेत विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आणि अग्नीशमन दलाचे पथक हे घटनास्थळी पोहोचले आहेत. या दुर्घटनेची माहिती देणारे ट्विटर हवाईदलाने केले.
जैसलमेरमधील दुर्घटनेची नियमानुसार चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई होईल; असे भारतीय हवाई दलाने ट्वीट करुन जाहीर केले. मिग २१ विमान सम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळुच्या टेकड्यांवर कोसळले.
ज्या ठिकाणी विमान कोसळले आहे ते ठिकाण पाकिस्तान सीमेपासून अगदी जवळ आहे. हा संपूर्ण भाग लष्कराच्या नियंत्रणाखाली असून सामान्य नागरिकांना येथे प्रवेशबंदी आहे, असे सांगण्यात आले.