विशेष प्रतिनिधी
दिल्ली : फेसबुकचे ट्रान्झिशन मेटामध्ये झालेले आहे. तर आता फेसबुकचे नवीन ऑफिस दिल्लीमध्ये सुरू होणार आहे. सेंटर फॉर फ्यूलिंग इंडियाज न्यू इकॉनॉमीच्या (CFINE) मदतीने भारतातील पुढील तीन वर्षांत 1 कोटी लहान व्यवसाय आणि अडीच लाख निर्मात्यांना याद्वारे मदत मिळणार आहे. हे आशियातील सर्वांत मोठे ऑफिस असणार आहे. जे गुरगावमध्ये सुरु होणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप अशा विविध टीम्स येथे एकत्र काम करताना दिसतील.
Meta’s new office to open in Gurgaon
भारत हा मोठय़ा लोकसंख्येचा देश आहे. इथे फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम सर्वात जास्त लोक वापरतात. त्यामुळेच भारताला इंटरनेटचे भविष्य म्हणूनदेखील पाहिले जाते. यासाठी इथे भारतातील गुरगावमध्ये हे ऑफिस सुरू करण्यात आलेले आहे. असे फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी पीटीआय सोबत बोलताना सांगितले आहे.
जास्तीत जास्त लोकांना प्रशिक्षण देण्याचे ध्येय मेटाने ठेवले आहर. हे प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे की, इथे इंटरनेटच्या साहाय्याने आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. असेदेखील मोहन यांनी यावेळी म्हटले आहे.
Meta’s new office to open in Gurgaon
महत्त्वाच्या बातम्या
- CDS Rawat Death : पहिले सीडीएस रावत यांच्या निधनाने देश शोकसागरात, जगभरातून उमटल्या प्रतिक्रिया, वाचा.. कोणकोणत्या देशांनी व्यक्त केला शोक!
- सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे” ग्रंथाचे उद्या डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन
- Rajnath Singh in Parliament : सीडएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यावर काय झाले? घटनेची चौकशी कोण करणार? राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली माहिती
- नव्या सीडीएसपुढे नवी आव्हाने; थिएटर कमांडची निर्मिती – कार्यवाही!!