• Download App
    रॉच्या एजंटनीच आपले अपहरण केले,चौकशीदरम्यान मारहाण केली, मेहूल चोक्सी याचा आरोप|Mehul Choksi is accused of being abducted by Roach's agents and beaten during interrogation

    रॉच्या एजंटनीच आपले अपहरण केले,चौकशीदरम्यान मारहाण केली, मेहूल चोक्सी याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय गुप्तहेर संस्था रिसर्च अंड अ‍ॅनालिसिस विंगच्या (रॉ) एजंटनीच आपल्याला अ‍ॅँटिग्वामध्ये अपहरण करून आणले. चौकशी घेऊन जाताना मारहाण केली, असा आरोप भारतीय बॅँकांना फसवून कॅरेबियन बेटांत पळून गेलेल्या मेहुल चोक्सी याने केला आहे.Mehul Choksi is accused of being abducted by Roach’s agents and beaten during interrogation

    एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मेहूल चोक्सी म्हणाला, मला विश्वास होता की ते (गुरमीतसिंग आणि गुरजित भंडाल) रॉ एजंट आहेत. जरी मी डोमिनिकाला पोचलो, तरीही मी रॉ एजंट बाबत आणि त्यांच्या जगभरातील ठिकाणांबद्दल ऐकलं होतं. या दोघांनी सांगितले की ते रॉचे एजंट आहेत आणि मला चौकशीसाठी घेऊन जात होते. ते माझ्याशी अगदी कठोरपणे वागत होते. तसेच त्यांनी मला मारहाण देखील केली होती.



    पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्याच्या हेतूने गेलेलं भारतीय पथक डोमिनिकाला गेलं होत. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. दरम्यान, मेहुल चोक्सी सध्या कॅरिबियन देश अँटिग्वामध्ये आहे. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मेहुल चोक्सीने मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये त्यानी अँटिग्वामध्ये अपहरण करून मारहाण करणारे रॉ एजंट्सनी असल्याचा दावा केला आहे.

    मेहुल चोक्सी म्हणाला, २३ मे रोजी तो बारबरा जाराबिकाच्या घरी तिला घेण्यास गेलो होतो. तेव्हा मी माझी गाडी घेऊन गेलो होतो. मी गाडी तिच्या घरोसमोर उभी केली आणि आतमध्ये गेलो. त्यावेळी मला काही चुकीचे वाटले नाही. ती दारु पित होती. तिने मला सोफ्यावर बसवले. तेव्हा दोन्ही बाजूने काही लोक घरात शिरले. ते म्हणाले की आपण कोण आहात हे आम्हाला माहित आहे आणि आम्ही आपल्याला चौकशीसाठी घेऊन जात आहोत. त्यापैकी दोघांनी माझे हात धरला. दोघांनी माझे पाय धरले.

    चोक्सी व नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला १३५०० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात गंडा घातला होता. चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला होता. आता ईडीने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची १८ हजार १७० कोटींची संपत्ती संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत १८ हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. या संपत्तीपैकी ९ हजार ३७१.१७ कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

    Mehul Choksi is accused of being abducted by Roach’s agents and beaten during interrogation

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार