विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातून मी पळून गेलो नाही तर वैद्यकीय उपचारांसाठी देश सोडला, असा दावा फरार आरोपी मेहुल चोक्सीने केला आहे. भारत सोडला तेव्हा माझ्यावर देश सोडून जाण्यासंबंधी कोणतेही वॉरंट निघाले नव्हते, असे सांगत जर जामीन मिळाला तर तो डोमिनिका सोडून कोठेही जाणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले. Mehul Choksi gave anothes reason
चोक्सी आता भारतात येणे टाळण्यासाठी नवे-नवे बहाणे शोधत आहे. आता त्याने अँटिग्वा पोलिसांना लेखी तक्रार केली असून त्याला मारहाण करून जबरदस्तीने डोमिनिकाला नेल्याचा दावा केला आहे. या अपहरणात त्याची मैत्रीण बारबरा जाबेरिका हिचा हात असल्याचे व मारहाण करणारे अँटिग्वा पोलिसांचे लोक असल्याचेही त्याने म्हटले आहे.
चोक्सीने तक्रार अर्जात म्हटले आहे की, गेल्या एक वर्षांपासून मी बारबरा जाबेरिकाबरोबर मित्राप्रमाणे अँटिग्वात राहत होतो. तिच्या सांगण्यावरून २३ मे रोजी मी तिच्या घरी पोचले तेव्हा ८-१० लोक आले आणि मला बेदम मारहाण केली. ते पोलिसांचे लोक असल्याचा दावा करीत होते. ज्यावेळी मला मारहाण होत होती तेव्हा बारबराने मला काही मदत केली नाही. यावरुन माझ्या अपहरणाच्या कारस्थानात तिचा सहभाग असल्याचे सिद्ध होत असल्याचे चोक्सी म्हणाला.
Mehul Choksi gave anothes reason
महत्त्वाच्या बातम्या
- वयोवृद्ध पत्नीला अमानुष मारहाण ; व्हिडिओ व्हायरल होताच आळंदीला निघून गेलेल्या गजानन बुवा चिकणकरला बेड्या
- M.S.DHONI : महेंद्रसिंग धोनी झाला पुणेकर पुण्याचा या भागामध्ये विकत घेतले घर !
- Pandharpur Wari : किमान 100 वारकऱ्यांसोबत पायी वारीला जाण्याची परवानगी द्यावी ; आळंदी देवस्थानाची मागणी
- लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलच्या प्रवासासाठी परवानगी देण्याची मागणी