• Download App
    काश्मीरी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मेहबूबांचा केंद्राला इशारा Mehbubaa Mufti targets Modi Govt on Kashmir issue

    काश्मीरी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मेहबूबांचा केंद्राला इशारा

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर – तालिबानमुळे अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावे लागले. आमच्याही सहनशीलतेचा अंत पाहू नका. ज्या दिवशी आमचा संयम सुटेल त्या दिवशी तुम्ही देखील राहणार नाहीत.’’ अशी धमकीच माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. Mehbubaa Mufti targets Modi Govt on Kashmir issue

    तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४७ साली या राज्याचे वेगळेपण कायम ठेवण्याचे आश्वाधसन दिले होते. स्वातंत्र्याच्या वेळी भाजप जर सत्तेत असता तर आज हे राज्य भारताचा भाग राहिला नसते असेही मेहबूबा यांनी स्पष्ट केले. काश्मीेरमधील असंतोष दडपण्यासाठी सरकार केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. भाजपची मंडळी सुधारली नाही तर देशाचे विभाजन अटळ आहे असेही त्या म्हणाल्या



    ‘‘ काश्मीअर खोऱ्यामध्ये पुन्हा शांतता निर्माण करायची असेल तर येथे नव्याने ३७० वे कलम येथे लागू केले जावे. चर्चेच्या माध्यमातून काश्मीतर प्रश्नाीवर तोडगा काढण्यात यावा. तालिबान्यांमुळे अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावे लागले, शेजाऱ्यांकडे पाहून केंद्र सरकारने वेळीच सावध व्हावे. सध्या जगाचे लक्ष तालिबानकडे लागले आहे. यानिमित्ताने मी देखील तालिबानी नेतृत्वाला जग तुमच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करू नका असे आवाहन करत आहे.’’ असे मेहबूबा म्हणाल्या.

    Mehbubaa Mufti targets Modi Govt on Kashmir issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!