Mehbooba Mufti : जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आपल्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा एक बेताल वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही दहशतवाद्यांच्या गोळ्यांमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटतो. पण अलीकडेच एका व्यक्तीला सीआरपीएफने गोळ्या घालून ठार केले. त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेलो, पण घराला कुलूप होते. मेहबूबा यांनी प्रश्न विचारला की, त्यांची (केंद्र सरकार) कोणती सिस्टिम आहे. आपल्या देशाच्या गोळीने कोणी ठार झाले तर ते ठीक, अन् तेच जर दहशतवाद्याच्या गोळीने ठार झाले तर ते चूक? Mehbooba Mufti Said Koi Mulk Ki Goli Se Mare Vo Thik Hai Terrorist Ki Goli Se Mare Vo Galat
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आपल्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा एक बेताल वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही दहशतवाद्यांच्या गोळ्यांमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटतो. पण अलीकडेच एका व्यक्तीला सीआरपीएफने गोळ्या घालून ठार केले. त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेलो, पण घराला कुलूप होते. मेहबूबा यांनी प्रश्न विचारला की, त्यांची (केंद्र सरकार) कोणती सिस्टिम आहे. आपल्या देशाच्या गोळीने कोणी ठार झाले तर ते ठीक, अन् तेच जर दहशतवाद्याच्या गोळीने ठार झाले तर ते चूक?
एवढेच नाही, यापूर्वी त्यांनी मुंबईतील क्रूझ ड्रग्जप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खान प्रकरणालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. एका ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, आर्यन खान (अभिनेता शाहरुख खानचा मुलगा) मुसलमान असल्याने त्रास दिला जात आहे. त्या म्हणाल्या की, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाच्या चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या आरोपाच्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करण्याऐवजी, केंद्रीय एजन्सी 23 वर्षांच्या मुलाच्या मागे लागल्या आहेत, कारण त्याचे आडनाव खान आहे. भाजपच्या कोअर व्होट बँकेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून काश्मिरात टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत. दहशतवादी निरपराध सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष्य करत असल्याचे दिसून आले आहे. यावरून केंद्र सरकारने सुरक्षा दलाला कारवाईची मोकळी सूट दिली आहे. स्थानिकांमध्ये दहशतवाद्यांच्या या कृत्यांमुळे भीतीची लाट पसरली आहे. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनात अडथळे आणण्यासाठी आधी पंडितांनाच लक्ष्य करण्यात येत होते, परंतु आता तेथील अल्पसंख्याक शीख समुदायावरही हल्ले झाल्याचे पाहण्यात आले आहे.
Mehbooba Mufti Said Koi Mulk Ki Goli Se Mare Vo Thik Hai Terrorist Ki Goli Se Mare Vo Galat
महत्त्वाच्या बातम्या
- इस्लामिक स्टेटचा क्रूरकर्मा दहशतवादी सामी जसीम इराकच्या ताब्यात, अमेरिकेने ठेवले होते 37 कोटी रुपयांचे बक्षीस
- ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा : रशियन हेरांनी चोरला अस्ट्राझेनेका लसीचा फॉर्म्युला, त्यावरूनच तयार केली स्पूतनिक-व्ही !
- महाराष्ट्र बंद : ठाण्यात रिक्षाचालकांना मारहाण, बेस्ट बसेसची तोडफोड, मुंबई-सोलापूरमध्ये टायर जाळले… कुठे-कुठे लागलं गालबोट?
- Nobel Prize In Economics : अमेरिकेचे डेव्हिड कार्ड, जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जागांवर सीबीआयच्या धाडी, अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल