• Download App
    मेहबूबा मुफ्तींना हमासच्या दहशतवाद्यांचा पुळका, काश्मीर खुला तुरुंग झाल्याचा आरोप करत निदर्शने करणाऱ्यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह |Mehbooba Mufti questions arrest of protesters accusing Hamas militants of being Kashmir's open prison

    मेहबूबा मुफ्तींना हमासच्या दहशतवाद्यांचा पुळका, काश्मीर खुला तुरुंग झाल्याचा आरोप करत निदर्शने करणाऱ्यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह

    जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना इस्त्राएलमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांचा पुळका आला आहे. इस्त्राएलविरुध्द निदर्शने करणाऱ्यांना कोरोना नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी अटक केल्यावर काश्मीर हा खुला तुरुंग झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.Mehbooba Mufti questions arrest of protesters accusing Hamas militants of being Kashmir’s open prison


    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना इस्त्राएलमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांचा पुळका आला आहे.

    इस्त्राएलविरुध्द निदर्शने करणाऱ्यांना कोरोना नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी अटक केल्यावर काश्मीर हा खुला तुरुंग झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



    मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, संपूर्ण जगात इस्त्राएल पॅलेस्टिीनींवर करत असलेल्या अत्याचारांचा निषेध केला जात आहे. निदर्शने होत आहे. मात्र, काश्मीरमध्ये यासाठी शिक्षा केली जात आहे.

    काश्मीरमध्ये एका कलावंताने पॅलेस्टिनींविषयी सहानुभूती दाखविल्यावर त्यला अटक करण्यात आली. श्रीनगर आणि शोपियान जिल्ह्यात इस्त्राएलविरुध्द निदर्शने करणाऱ्या २१ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

    त्यासाठी कोरोना नियमावलीचे कारण देण्यात आले. दक्षिण काश्मीरमधील मौलाना सरजन बरकाती यांनी पॅलेस्टिीनींना पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

    यावर मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, काश्मीर हा खुला तुरंग झाला आहे. लोकांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य राहिले नाही. आपले मत व्यक्त करण्यापासून रोखले जात आहे.

    मोह्ममद अर्शफ शहराई या विघटनवादी नेत्याच्या दोन मुलांना पब्लीक सेफ्टी अ‍ॅक्टखाली सरकारने अटक केली आहे. त्यावर मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, हा कायदा लावून धरपकड करणे हा काश्मीरच्या प्रत्येक प्रश्नावर केंद्र सरकारचा उपाय आहे.

    Mehbooba Mufti questions arrest of protesters accusing Hamas militants of being Kashmir’s open prison

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Finance Ministry : अर्थ मंत्रालयाने मान्य केले अर्थव्यवस्थेची गती मंदावली; महाग तेल-लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन बिघडल्याचा परिणाम

    JDU MLA Shyam Rajak : जेडीयूमध्ये निशांत यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी; श्याम रजक म्हणाले- निर्णय एनडीएचा; सम्राटही दावेदार

    Kerosene : पेट्रोल पंपावर केरोसीनही मिळेल, केंद्र सरकारचा निर्णय; जिल्ह्यात 2 पंपांवर मिळेल सुविधा, तेल कंपन्या जास्तीत जास्त 5 हजार लिटर तेल ठेवू शकतील