• Download App
    Mehbooba Mufti मेहबूबा मुफ्ती यांनी हिजबुल्लाचा नेता

    Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती यांनी हिजबुल्लाचा नेता नसरुल्लाला संबोधले शहीद

    शोक व्यक्त करत एक दिवसाचे सर्व नियोजित कार्यक्रम केले रद्द


    विशेष प्रतिनिधी

    इस्रायलने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचा  नेता हसन नसरुल्लाहला ठार मारले आहे. यावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. शनिवारी काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी इस्रायलच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील हसनाबाद, रैनावरी, सैदाकडल, मीर बिहारी आणि आशाबाग भागात मुलांसह मोठ्या संख्येने लोक काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले. मात्र, निदर्शने शांततेत पार पडली. दरम्यान, मेहबूबा मुफ्ती  ( Mehbooba Mufti )   यांनी नसरुल्ला यास शहीद म्हटले आहे.



    पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी आपला निवडणूक प्रचार कार्यक्रमही एका दिवसासाठी पुढे ढकलला. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, लेबनॉन आणि गाझामधील शहीद जवानांना विशेषत: हसन नसरुल्लाह यांच्याशी एकनिष्ठा दाखवत मी उद्याची प्रचारमोहीम रद्द करत आहे. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या लोकांसोबत उभे आहोत.

    निदर्शकांनी इस्रायलविरोधी आणि अमेरिकाविरोधी घोषणा दिल्या आणि लेबनीज अतिरेकी गटाच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येचा निषेध केला. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. श्रीनगरचे लोकसभा सदस्य आगा रुहुल्ला यांनीही आपला प्रचार स्थगित केला. ते नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांचा प्रचार करत होते.

    Mehbooba Mufti called Hezbollah leader Nasrullah a martyr

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये