विशेष प्रतिनिधी
जयपूर – कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने पूर्ण केल्या नाहीत तर हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकणार नाही, असा इशारा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिला आहे.Meghayala governor backs farmers agitation
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्यावर मी अनेकांशी भांडलो आहे. त्यांच्यासाठी मी पंतप्रधान, गृह मंत्र्यांपासून सर्वांशी मी भांडलो आहे. तुम्ही चुकीचे करीत आहात, असे करू नका, असेही मी प्रत्येकाला सांगितले आहे, असेही उत्तर प्रदेशमधील जाट नेते असलेले मलिक म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,‘‘ जर मोदी सरकारने किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) हमीवर कायदा करायला हवा. ‘एमएसपी’वर कायदा झाल्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन थांबेल आणि या प्रकरणात निश्चिकतपणे मार्ग काढता येईल. उत्तर प्रदेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्विभूमीवर अनेक गावात भाजप नेते प्रवेश करू शकत नाहीत. मी मूळचा मेरठचा आहे. माझ्या भागात भाजपचा एकही नेता गावात फिरकू शकत नाही. मुझफ्फरनगर, बागपतमध्येही हीच स्थिती आहे.’’
Meghayala governor backs farmers agitation
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविणार
- नगरसेवक फोडण्याचा बार फुसका, हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकून बघतोय कोण?; भाजपचा पलटवार
- रणजीत सिंह हत्या प्रकरण : राम रहीमसह पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा, १९ वर्षानंतर कुटुंबाला मिळाला न्याय
- T20 वर्ल्ड कप मधली भारत – पाकिस्तान मॅच स्थगित करा; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी
- पवार साहेब…तुमच्या सरकारला सांगून गांजा लागवडीची परवानगी द्याच