• Download App
    मेघालय हनीमून हत्याकांड Meghalaya Honeymoon Murder, Accused Custody, Police Recreate

    Meghalaya : मेघालय हनीमून हत्याकांड, आरोपींना 8 दिवस कोठडी, दृश्य रिक्रिएट करणार पोलिस

    Meghalaya

    वृत्तसंस्था

    शिलाँग : Meghalaya  इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी याच्या हत्येच्या आरोपाखाली पत्नी सोनम आणि इतर चार आरोपींना बुधवारी शिलाँग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पाचही जण कोर्टरूममध्ये असताना कुणीही एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून बघितले नाही. सध्या तरी, पाचही जण शिलाँगच्या सदर पोलिस ठाण्यात रात्र घालवतील पोलिस सूत्रांनी सांगितले की, सोनम काल रात्रीपासून पोलिस कोठडीत होती. ती मध्यरात्रीपर्यंत बॅराकीत जागी होती. याआधी तिची वैद्यकीय तपासणीही झाली. यात ती गर्भवती आढळली नाही. उर्वरित आरोपींना बुधवारी सकाळी शिलाँगला आणण्यात आले.Meghalaya

    पोलिस सूत्रांच्या मते, सोमवारी पहाटे ३ वाजता जेव्हा सोनमला गाझीपूरच्या ढाब्यावरून ताब्यात घेतले तेव्हा शिलाँगच्या २७ तासांच्या प्रवासात ती कोणाशीही बोलली नाही. बुधवारी सकाळी ११ वाजता पोलिसांनी तिची चौकशी केली. तेव्हा तिने दावा केला की त्यांना लुटण्यात आले. पण, जेव्हा पोलिसांनी एसआयटीने गोळा केलेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड, गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेला रेनकोट, रक्ताने माखलेला शर्ट दाखवला तेव्हा ती मोठ्याने रडू लागली. पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे एसपी विवेक श्याम म्हणाले की पुरावे खूप भक्कम आहेत, म्हणून सोनमने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आता पोलिस गुरुवारी पाचही आरोपींना समोरासमोर आणू शकतात. सर्वांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलिस घटनास्थळी दृश्य पुन्हा सकारतील.



    हवाला पैसे चुलत भावाच्या खात्यात जात

    इंदूर पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की सोनमचा प्रियकर राज कुशवाहा जितेंद्र रघुवंशीच्या खात्यात हवालामार्फत पैसे ट्रान्सफर करत असे. जितेंद्र हा सोनमच्या मावशीचा मुलगा आहे.

    राजाच्या आईच्या गळ्यात पडून रडला सोनमचा भाऊ

    दरम्यान, सोनमचा भाऊ गोविंद राजाच्या इंदूर येथील घरी पोहोचला. तो राजाच्या आईच्या पाया पडला आणि त्यांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडला. तो म्हणाला, माझी बहीण दोषी असेल तर तिला फाशीच द्यावी. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून मला १००% खात्री आहे की तिनेच हत्या केली आहे.

    Meghalaya Honeymoon Murder, Accused Custody, Police Recreate

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ICMR : कोविडनंतर अचानक होणाऱ्या मृत्यूंवर अभ्यास; ICMRचा दावा- लसीशी याचा संबंध नाही

    Delhi : दिल्ली- जुन्या वाहनांसाठी ‘नो-फ्यूल’ आदेश मागे घेण्याची तयारी; मंत्री म्हणाले- प्रदूषण थांबवायला हवे

    Jaishankar : जयशंकर म्हणाले- दहशतवादाविरुद्ध भारताचे झीरो टॉलरन्स; आम्ही दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर देत आहोत