मेघालयमध्ये स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला मिळालेले नाही, मात्र एनपीपी हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे
प्रतिनिधी
त्रिपुरा आणि नागालँडमध्ये मतमोजणीनंतर सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाने या ठिकाणी पुन्हा एकदा सत्तेत वापसी केली आहे. तर मेघालयमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. परिणमी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी भाजपाला युती सरकार स्थापन करण्यासाठी मदत मागितली होती. तर भाजपानेही एनपीपीला पाठिंबा दर्शवला आहे. Meghalaya CM Sangma calls Amit Shah to support NPP to form govt
प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री संगमा यांनी गृहमंत्री अमित शाहांशी फोनवरून चर्चा केली आणि सरकार बनवण्यासाठी भाजपाचा पाठिंबा मागितला होता. या चर्चेनंतर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मेघालय प्रदेश भाजपाला एनपीपीला पाठिंबा देण्याची सूचना केली.
५९ जागांवर झाली होती निवडणूक –
मेघालयमध्ये २७ फेब्रुवारी रोजी ६० पैकी ५९ जागांसाठी ८५.२७ टक्के मतदान झाले होते. तर सोहियोंग मतदारसंघात यूडीपी उमेदवार एडीआर लिंगदोह यांच्या निधनामुळे निवडणूक झाली नाही. यावेळी एनपीपीने ५७, भाजपा आणि काँग्रेसने ६०-६० आणि टीएमसीने ५६ जागांवर उमेदवार दिले होते.
एकूण जागा – ६०
एनपीपी- २६
यूडीपी-११
काँग्रेस- ०५
टीएमसी- ०५
काँग्रेस-०२
एका जागेवर अद्याप मतमोजणी सुरू आहे…
Meghalaya polls: CM Sangma calls Amit Shah, BJP to support NPP to form govt
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस आमदार सफिया जुबेर म्हणाल्या- आम्ही राम-कृष्णाचे वंशज : अमीन खान म्हणाले – भारत धर्मनिरपेक्ष मानले जात नाही, हिंदू राष्ट्रातही कोणी मारणार नाही
- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाले
- केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींचे भाषण: म्हणाले- जिथे लोकशाही नाही, असे जग निर्माण होताना पाहू शकत नाही