• Download App
    कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर संक्रांत; सुनील जाखड, अंबिका सोनी यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर; मग सिध्दूंच्या हातात काय...?? Meeting (CLP meet) has been called. Things will be discussed in the meeting

    कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर संक्रांत; सुनील जाखड, अंबिका सोनी यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर; मग सिध्दूंच्या हातात काय…??

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वावर संक्रांत आणल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, अंबिका सोनी यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आली आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रत्येक बाबीवर चर्चा होईल, असे बंडखोर आमदार आणि भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार परगटसिंग यांनी स्पष्ट केले आहे. Meeting (CLP meet) has been called. Things will be discussed in the meeting

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांचा कँप जोरात असून आज सायंकाळच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आक्रमक होणार आहे हे उघड आहे. काँग्रेसचे आमदार उघडपणे नेतृत्वबदलाची मागणी उचलून धरून नव्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सुनील जाखड आणि अंबिका सोनी या दोन जुन्याच काँग्रेस नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असतील, तर कॅप्टन अमरिंदर सिंगांविरोधात बंड करून नवज्योत सिंग सिध्दू यांच्या हाताला काय लागले असा प्रश्न तयार होतो आहे.

    काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या उचलबांगडीसाठी राजकीय व्यूहरचना केली आहे. काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरिष रावत हे अजय माकन आणि हरिष चौधरी या नेत्यांसह पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून चंडीगडमध्ये होणाऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. काँग्रेसच्या ४० आमदारांनी पक्षनेतृत्वाकडे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदात बदल करण्याची मागणी केली आहे.

    कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही या बंडखोरीची पुरती जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी देखील आपल्या कँपची तयारी पूर्ण केली आहे. ते कदाचित आजच्या सायंकाळच्या बैठकीपूर्वीच काही राजकीय धमाका करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व जर आपल्याला धडा शिकविण्याच्या बेतात असेल, तर आपणही काही कमी नाही, हे कॅप्टन अमरिंदर सिंग पक्ष नेतृत्वाला दाखवून देतील, असे त्यांच्या कँपमधल्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

    Meeting (CLP meet) has been called. Things will be discussed in the meeting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक