वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभरात दहशतवादाला बळी पडलेल्यांच्या वारसांसाठी मेडिकल कोर्स मधल्या एमबीबीएस / बीडीएस जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. तशा सूचना केंद्रीय आयुष मंत्रालयाला दिले असून आयुष मंत्रालयाने त्या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. Medical seats are reserved for heirs of victims of terrorism
2022 – 23 या शैक्षणिक वर्षासाठी एमबीबीएस कोर्सच्या 4 जागा राखीव ठेवल्या असून त्यामध्ये बिहारच्या गया मधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईचे ग्रँड मेडिकल कॉलेज येथे प्रत्येकी 1, तर छत्तीसगडमधील पंडित जवाहरलाल नेहरूंनी रॉयल मेडिकल कॉलेज येथे 2 जागा राखीव ठेवल्या आहेत.
देशभरात कोठेही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांच्या पाठीशी केंद्र सरकार उभे राहते. परंतु ज्या मुलांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आपले आई-वडील असे दोन्ही गमावले आहेत, त्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करून वर उल्लेख केलेला निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्याच्या साथीदाराचाही विचार करून पती अथवा पत्नीसाठी राखीव जागा ठेवली आहे. परंतु, प्राधान्यक्रमानुसार ज्या मुलांनी आपले आई-वडील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गमावले आहेत, त्यांना मेडिकल प्रवेशासाठी राखीव जागांमध्ये प्राधान्य देण्यास निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Medical seats are reserved for heirs of victims of terrorism
महत्वाच्या बातम्या