• Download App
    हिंमत असेल तर मेडीकल माफियांनी आमिर खानवर गुन्हा दाखल करावा, योगगुरू बाबा रामदेव यांचे आयएमएला आव्हान|Medical mafia should file case against Aamir Khan if he has the guts, yoga guru Baba Ramdev challenges IMA

    हिंमत असेल तर मेडीकल माफियांनी आमिर खानवर गुन्हा दाखल करावा, योगगुरू बाबा रामदेव यांचे आयएमएला आव्हान

    प्रसिध्द अभिनेता आमिर खान याने आपल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील औषधांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. वास्तविक किंमतींच्या 50 पट अधिक दराने ही औषधे विकली जात असल्याचा आरोप केला होता. हिंमत असेल तर या मेडीकल माफियांनी आमिर खानविरुध्द गुन्हा दाखल करावा, मोर्चे काढावेत असे आव्हान योगगुरू बाबा रामदेव यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनला दिले आहे.Medical mafia should file case against Aamir Khan if he has the guts, yoga guru Baba Ramdev challenges IMA


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : प्रसिध्द अभिनेता आमिर खान याने आपल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील औषधांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. वास्तविक किंमतींच्या 50 पट अधिक दराने ही औषधे विकली जात असल्याचा आरोप केला होता.

    हिंमत असेल तर या मेडीकल माफियांनी आमिर खानविरुध्द गुन्हा दाखल करावा, मोर्चे काढावेत असे आव्हान योगगुरू बाबा रामदेव यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनला दिले आहे.



    योगगुरू रामदेव बाबा यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर आयएमएने त्यांच्यावर टीका केली होती. न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांनी शनिवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आमीर खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

    मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच रामदेव यांनी दिले आहे. या व्हिडिओमध्ये आमीरने देशातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाºया तज्ज्ञांसोबत चर्चा केली आहे.

    त्यामध्ये, वैद्यकीय क्षेत्रातील औषधांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. वास्तविक किंमतींच्या 50 पट अधिक दराने ही औषधे विकली जात असल्याचा आरोप केला होता.

    देशातील बड्या औषध कंपन्या आणि मेडिकल माफिया एलोपॅथी औषधांच्या माध्यमातून 2 लाख कोटी रुपयांची उलाढाल करुन मोठा नफा कमावतात. या क्षेत्राशी निगडीत लोक स्वाथार्पोटी मोठा नफा कमावून औषधांची चढ्या दराने विक्री करतात,

    असा आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे. देशातील नागरिकांना आयुवेर्दांच्या माध्यमातून स्वस्त आणि सुलभ उपचार देऊ इच्छित असल्याचही रामदेव यांनी म्हटलं आहे.

    Medical mafia should file case against Aamir Khan if he has the guts, yoga guru Baba Ramdev challenges IMA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Golden Temple : सुवर्ण मंदिरावर पुन्हा बॉम्ब हल्ल्याची धमकी; 24 तासांत आणखी एक ई-मेल

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन: बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक; सरकारकडून 7 महत्त्वाची विधेयके सादर होणार