• Download App
    परदेशातून आलेली वैद्यकीय उपकरणे, औषधांचे विविध राज्यांना वितरण|Medical equipment imported from abroad,Distribution of drugs to different states

    परदेशातून आलेली वैद्यकीय उपकरणे, औषधांचे विविध राज्यांना वितरण

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाचा देशात हाहाकार उडाल्यानंतर परदेशातून वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचा ओघ वाढला आहे. त्याचे विविध राज्यात वितरण तातडीने करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सुमारे 40 लाख विविध औषधे आणि वस्तू यांचे वितरण केले गेले आहे.Medical equipment imported from abroad,Distribution of drugs to different states

    कोरोनामुळे देशात आरोग्य प्रश्न जटिल होताच ऑक्सिजन, ऑक्सिजन उपकरणे, वैद्यकीय साहित्य, उपकरणे आणि औषधांचा साठा घेऊन विविध देशांची विमाने भारतात एप्रिलमध्ये उतरली होती. त्याचे वितरण जेथे आवश्यक आहे



    तेथे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कस्टम विभागाला ही उपकरणे तातडीने पुढे पाठविण्याची सूचना केली आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी नेमले आहेत.

    आरोग्य मंत्रालयाने अतिरिक्त सचिवांच्या नेतृत्वाखाली एक खास विभाग या साहित्यावर देखरेख आणि वितरणासाठी उघडला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून साहित्य आणि औषधे युद्धपातळीवर पाठविण्यात आली.

    चाळीस लाख वस्तूंचे वितरण

    सुमारे 40 लाख वस्तू 24 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वितरण विविध राज्यातील 38 संस्थांना केले आहे. मोठ्या प्रमाणात उपकरणांमध्ये बीआयपीएपी मशीन्स, ऑक्सिजन (ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर्स, पीएसए ऑक्सिजन प्लांट्स, पल्स ऑक्सिमीटर), औषधे (फ्लॅव्हीपॅव्हिरिव्हर आणि रीमॅडेव्हिव्हर्स), पीपीई (कव्हरेल्स, एन- 95 मास्क आणि गाऊन) यांचा समावेश आहे.

    Medical equipment imported from abroad,Distribution of drugs to different states

     

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!