वृत्तसंस्था
भवानीपूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भवानीपूरच्या पोटनिवडणुकीत कडवी टक्कर देणाऱ्या भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल आता स्मृती इराणींच्या भूमिकेत शिरल्याचे दिसत आहे.Me Woman of the Match”, Priyanka Tibrewal in the role of Smriti Irani
भवानीपूरची निवडणूक ममता बॅनर्जी यांनी जिंकली असली तरी मी “वुमन ऑफ द मॅच” आहे. कारण ममतांच्या घरच्या मतदार संघात घुसून मी २५ हजारांपेक्षा जास्त मते घेतली आहेत, असे प्रियांका टिबरेवाल यांनी पत्रकारांना सांगितले. यापुढे देखील मी भवानीपूरमध्ये काम करत राहणार आहे. मी भाजपची कट्टर कार्यकर्ता आहे. मी हार मानणार नाही, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या आहेत. यातूनच त्या आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या भूमिकेत शिरल्याचे स्पष्ट होत आहे.
स्मृती इराणींनी 2014 च्या निवडणुकीत त्यावेळचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठीमध्ये निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत स्मृती इराणी यांचा पराभव झाला. परंतु, त्यांनी त्यानंतरच्या पाच वर्षात अमेठी सोडली नाही. अमेठीत या काम करत राहिल्या. त्याचे फळ त्यांना 2019 च्या निवडणुकीत मिळाले.
2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा त्यांनी पराभव केला. राहुल गांधी यांना दोन मतदारसंघातून उभे राहणे भाग पडले. ते केरळच्या वायनाड या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. पण आपला परंपरागत अमेठी मतदार संघ त्यांना स्मृती इराणी यांच्यामुळे गमवावा लागला.
हेच उदाहरण प्रियांका टिपरे वाल्यांनी डोळ्यासमोर ठेवल्याचे दिसत आहे. मी भवानीपूर सोडणार नाही. मी काम करत राहीन, या त्यांच्या वक्तव्यातून नेमके हेच स्पष्ट होताना दिसत आहे. पुढच्या तीन वर्षात प्रियांका टिबरेवाल भवानीपूर मतदार संघात टिकून राहिल्या आणि काम करत राहिल्या तर त्याचे फळ मिळण्याची त्यांना आशा आहे. येथेच त्यांचे पाऊल स्मृती इराणी यांच्या पावलावर पडताना दिसत आहे.
Me Woman of the Match”, Priyanka Tibrewal in the role of Smriti Irani
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याचे मुख्यमंत्री म्हणे अशोक चव्हाण ; विनायक राऊत चक्क उद्धव ठाकरे यांनाच विसरले
- ममता बॅनर्जींनी भवानीपूरच्या विजयाचे श्रेय दिले बिगर बंगाली मतदारांना!!… पण का??
- कायदा आणि सुव्यवस्थेच्या बैठकीत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे काय काम? सीएम चन्नींसमोर नवे संकट
- नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर कोल्हापूर मधील रस्ते दुरुस्तीचे काम सुरू, पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा