• Download App
    काशीमध्ये महापौर परिषद; आपल्या शहरांच्या विकासाची प्रेरणा काशीतून घेऊन जा; पंतप्रधान मोदींचे सर्व महापौरांना आवाहन । Mayor's Council in Kashi; Take the inspiration for the development of your cities from Kashi; Prime Minister Modi's appeal to all mayors

    काशीमध्ये महापौर परिषद; आपल्या शहरांच्या विकासाची प्रेरणा काशीतून घेऊन जा; पंतप्रधान मोदींचे सर्व महापौरांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    काशी : भारतातले सर्वात प्राचीन शहर काशी हे आता देशातले अत्याधुनिकतेशी जोडलेले शहर ठरले आहे. प्राचीन वारशाच्या समृद्ध परंपरेबरोबरच विकासाचे आधुनिक आयाम देखील काशीने जोडले आहेत. आपल्या शहरांच्या विकासाच्या प्रेरणा आपण काशीतून घेऊन जा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. Mayor’s Council in Kashi; Take the inspiration for the development of your cities from Kashi; Prime Minister Modi’s appeal to all mayors

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटनानंतर संपूर्ण महिनाभर जे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, त्यामध्ये देशभरातल्या महापौरांची परिषद आज काशीमध्ये संपन्न होत आहे.या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. यावेळी केलेल्या भाषणात मोदी यांनी देशभरातल्या महापौरांना आपापल्या शहरांमध्ये विविध अभिनव उपक्रम राबविण्याची सूचना केली.

    काशी जसे प्राचीन शहर आहे तशीच अनेक शहरे आपापल्या परंपरागत वारशांसह आधुनिकतेशी नाळ जोडून आहेत. या शहरांचा विकास करण्याची प्रेरणा आपण काशीतून घेऊन जाऊ शकता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काशीच्या अर्थव्यवस्थेत गंगेचे महत्त्व खूप मोलाचे आहे. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या विकासाबरोबरच गंगेचे घाट विकसित करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान सातत्याने सुरू आहे. काशीतली वारसास्थळे पुन्हा संपन्न रूपात जगासमोर येत आहेत. जसा समृद्ध वारसा काशीमध्ये आहे तसाच वारसा आपल्या शहरांमध्ये देखील आहे. हे सगळे वारसे आपण विकसित करा.+



    या शहरांचे वैशिष्ट्य टिकून त्यांचे संवर्धन होईल, असे उपक्रम राबवा. नदी संरक्षण संवर्धन उपक्रम, शहरातले वाॅर्ड ब्युटीफिकेशन उपक्रम यांसारख्या अभिनव योजना राबवा, नदी संरक्षण-संवर्धन सप्ताह आयोजित करा, आपली शहरे नदी संस्कृतीशी जोडली आहेत ही संस्कृती पुन्हा संवर्धित करा, विविध सौंदर्य स्पर्धा होतात परंतु आपल्या शहरांमध्ये वाॅर्डाची सौंदर्यीकरण स्पर्धा आयोजित करा, स्वच्छता हा केवळ एक उपक्रम नाही तर ती संपूर्ण शहराला सवय लावण्यासाठी काम करा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

    देशातल्या प्रत्येक शहराकडे स्वत:च्या वैशिष्ट्याचा वारसा आहे. ती वैशिष्ट्य विकसित करून आधुनिक परंपरेशी जोडण्यासाठी सतत प्रयत्न केल्याने काशी इतकाच इतर शहरांचाही विकास होईल आणि हा कालबद्ध कार्यक्रम येत्या पाच ते दहा वर्षांमध्ये व्यवस्थित राबवता येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

    केंद्रीय शहरी विकास मंत्रालय स्वच्छता अभियानाचे संदर्भात स्पर्धा घेते परंतु ही स्पर्धा विविध शहरांमध्ये वाॅर्ड स्तरावर घेऊन संपूर्ण शहराचा कायापालट करण्याची गरज आहे. यासाठी सर्व महापौर आपापसात विचारमंथन करून कालबद्ध कार्यक्रम पत्रिका ठरवू शकतात. काशी यासाठी आपल्याला प्रेरणा देईल, असे उद्गारही पंतप्रधान मोदींनी काढले.

    स्वच्छता अभियानात विशिष्ट शहरांना पुरस्कार मिळतात हा समज काढून टाकून देशभरातील सर्व शहरांनी आणि नगरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे. जे घेणार नाहीत स्वच्छता अभियान राबवणार नाहीत, त्यांच्या जाहिराती करून नागरिकांमार्फत या शहरातल्या अधिकाऱ्यांवर – पदाधिकाऱ्यांवर दबाव वाढवा. त्यातून सर्व शहरे स्वच्छ होतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

    महापौर परिषदेनंतर सर्व महापौरांचा गंगा आरतीचा कार्यक्रम काशीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्याच बरोबर काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर तपशीलवार माहिती सर्व महापौरांना देण्यात येत आहे.या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी आणि उत्तर प्रदेशातले मंत्री उपस्थित होते.

    Mayor’s Council in Kashi; Take the inspiration for the development of your cities from Kashi; Prime Minister Modi’s appeal to all mayors

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य