• Download App
    मायावतींच्या बहुजन समाज पक्षातही भाई-भतीजावाद, उत्तराधिकारी म्हणून पुतण्याला पुढे आणण्याची तयारी Mayawati's Bahujan Samaj Party is also ready to bring nephew as its successor

    मायावतींच्या बहुजन समाज पक्षातही भाई-भतीजावाद, उत्तराधिकारी म्हणून पुतण्याला पुढे आणण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपण तंदुरुस्त असल्याने उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. मात्र, सध्या त्या पध्दतशीरपणे आपला पुतण्या आकाश आनंद याला पुढे आणत आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही आकाश आनंद यांच्यामार्फतच मायावतींशी संवाद साधता येतो. त्यामुळे त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे. Mayawati’s Bahujan Samaj Party is also ready to bring nephew as its successor

    आकाश आनंद हे मायावती यांचे भाऊ आनंद कुमार यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी लंडनमधील एका प्रसिध्द संस्थेतून एमबीए केले असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी पाहिली होती. बसपच्या कोणत्याही महत्वाच्या कार्यक्रमात आकाश आनंद हे मायावतींच्या सोबतच असतात. अखिलेश यादव यांनी मायावती यांची भेट घेऊन सपा-बसपा आघाडी केली तेव्हा आकाश आनंद उपस्थित होते. त्यामुळे आनंद यांचे महत्व पक्षात वाढले आहे.



    त्याचबरोबर उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्राम्हण समाजाला आकर्षित करून घेण्यासाठी सरचिटणिस सतीश मिश्रा यांच्याकडे पक्षाचे सेकंड-इन-कमांड म्हणून पाहिले जाते. सतीश मिश्रा यांचा मुलगा कपिल मिश्रा आणि जावई परेश मिश्रा हे देखील बहुजन समाज पक्षाचे नवे चेहरे म्हणून पुढे येत आहेत. पक्षाच्या हायकमांडकडून त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्यात येत आहे. सध्या मिश्रा यांच्याकडे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण संमेलनांची जबाबदारी देण्यात आली आहे.

    बसपचे जुने कार्यकर्ते सांगतात की सध्या लखनऊमधील बसपा कार्यालयात, बेहेनजी (मायावती) आणि सतीश मिश्रा यांच्या कारशिवाय फक्त आकाश, कपिल आणि परेशच्या गाड्याप्रवेशद्वारांवर तपासल्या जात नाहीत. ही त्यांची पक्षातील ताकद आहे. इतर कोणालाही सुरक्षा तपासणीशिवाय पक्षाच्या कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी नाही. पक्षाचे खासदार आणि आमदारसुद्धा सुरक्षा तपासणीनंतर आत जातात. त्यामुळे पक्षातील पदाधिकाºयांनी या तिघांना नेतृत्वाची दुसरी पायरी मानण्यास सुरुवात केली आहे.

    Mayawati’s Bahujan Samaj Party is also ready to bring nephew as its successor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य